Agri Business: तुम्हाला शेती आणि वनस्पतींची आवड आहे? तर सुरू करा हा व्यवसाय; कमवाल लाखो रुपये

Agri Business
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agri Business| शेती आणि वनस्पतींची आवड असलेल्या व्यक्तींसाठी शेतीचे असे काही उत्तम पर्याय आहेत त्यातून ते चांगला नफा कमवू शकतील. तसेच, शेतीसाठी मोठी जागा उपलब्ध असल्यास नर्सरी व्यवसायात (Nursery Business) त्यांना अधिक फायदा होऊ शकतो. कारण सध्या औषधी वनस्पती आणि वनवृक्षांच्या नर्सरींसाठी मोठी मागणी निर्माण झाली आहे. त्यामुळे आज आपण नर्सरी व्यवसायाचे विविध प्रकार जाणून घेणार आहोत.

१) भाजीपाला नर्सरी – शहरी भागात स्वतःच्या घरातच भाजीपाला पिकवण्याची संकल्पना सध्या अधिक लोकप्रिय आहे. कारण ग्राहक विषमुक्त आणि सेंद्रिय पद्धतीने उगवलेल्या भाज्यांना मोठी पसंती देतात. टोमॅटो, वांगी, मुळा, गाजर, पालक, कोथिंबीर यांसारख्या भाज्यांची रोपे विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यास नर्सरी व्यवसायातून चांगला नफा कमवता येतो.

२) फुलांची नर्सरी – फुलांची मागणी सण, समारंभ आणि पूजाविधींसाठी वर्षभर असते. त्यामुळे गुलाब, झेंडू, लिली, मोगरा, तगर, जास्वंद यांसारख्या फुलझाडांची नर्सरी उभारून चांगला व्यवसाय करता येतो. हे रोपे सौंदर्यवर्धनासाठी घरगुती गार्डनिंगसाठीही मोठ्या प्रमाणावर विकत घेतली जातात.

३) फळझाडांची नर्सरी – शहरी आणि ग्रामीण भागात फळझाडे लावण्याकडे कल वाढला आहे. आंबा, डाळिंब, संत्रा, लिंबू, पपई, चिकू आणि ड्रॅगन फ्रूटसारख्या फळझाडांची रोपे विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यास मोठा ग्राहकवर्ग तयार करता येतो. यामध्ये दीर्घकालीन फायदा मिळतो. कारण एकदा रोपे विकली गेल्यावर ग्राहक पुढील काळातही नवीन रोपे विकत घेतो.

४) औषधी वनस्पतींची नर्सरी – सध्या नैसर्गिक आणि सेंद्रिय उपचार पद्धतींना लोक अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कोरफड, ब्राह्मी, तुलसी, वासाका, गुळवेल, कढीपत्ता, शतावरी यांसारख्या औषधी वनस्पतींची नर्सरी सुरू करूनही चांगला नफा मिळवता येतो. औषधी वनस्पतींची वाढती मागणी लक्षात घेता, हा व्यवसाय (Agri Business) फायदेशीर ठरू शकतो.

५) वनवृक्ष नर्सरी – वनविकास आणि पर्यावरण संरक्षण योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाते. अशा परिस्थितीत सागवान, निलगिरी, महोगनी, पाईन आणि चंदन यांसारख्या झाडांची रोपे विकून मोठा नफा मिळवता येतो. सरकारच्या विविध योजनांमधून अशा रोपांची मोठ्या प्रमाणावर मागणी येते, त्यामुळे या क्षेत्रात व्यवसायाची संधी अधिक आहेत.

दरम्यान, कमी गुंतवणुकीत अधिक नफा, सेंद्रिय शेतीच्या वाढत्या ट्रेंडमुळे वाढली मागणी, सरकारी योजनांमधून मिळणारे अनुदान, शहर आणि ग्रामीण भाग दोन्हीकडे मोठी बाजारपेठ उपलब्ध असे अनेक फायदे नर्सरी व्यवसायामध्ये (Agri Business) आहे. ज्यातून इच्छूक चांगला नफा कमवू शकतात.