सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे किती नुकसान झालं? कृषी विभागाकडून अहवाल सादर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्याला सलग दोन दिवस अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे जिल्ह्यातील खटाव, वाई आणि माण तालुक्यातील 84 गावांतील गहू, ज्वारी, कांदा या खरीप पिकांसह स्ट्राबेरी, आले, भाजीपाल्याचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडून सादर करण्यात आला असून जिल्ह्यातील खटाव, वाई आणि माण तालुक्यातील 84 गावांतील सुमारे 483.85 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडल्यानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कृषी विभागास दिले आहेत. त्यानुसार कृषी विभागाकडून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नुकसानीचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल तयार केला जात आहे. या विभागणारे काही तालुक्याचे शेतीच्या नुकसानीचे नजर अंदाजद्वारे पंचनामे केले असून त्याचा सादर केला आहे.

crops

शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक शेतीतून आपला नफा दुप्पट करत आहेत. यासाठी Hello Krushi अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहे. नवनवीन तंत्रज्ञान, उपकरणे यांची माहिती या अँपवर आहे. यासोबत तुम्हाला कोणतीही शेती उपयोगी उपकरणे अतिशय कमी किंमतीत विकत घ्यायचे असतील तर Hello Krushi अँप मोबाईल वर इंस्टॉल करून तुम्ही थेट Manufacturer कडून ते विकत घेऊ शकता. तसेच कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधनाची माहिती यावर दिली जाते. याव्यतिरिक्त Hello Krushi मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतील. त्यासाठी Hello Krushi डाउनलोड करा.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस खटाव वाई आणि मान तालुक्यात झाला असून येथील झालेल्या मोठ्या नुकसानीचे पंचनामे नुकतेच करण्यात आले आहे तर काही ठिकाणाचे अजूनही केले जात आहेत. नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसाने वाई तालुक्यातील सर्वाधिक 80 गावांना झोडपले. या गावांतील सुमारे 470.75 हेक्टर शेतीतील ज्वारी गहू हरभरा कांदा स्ट्रॉबेरी भाजीपाला या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. माण तालुक्यात एका गावात झालेल्या अवकाळी पावसाने भाजपाल्यासह ज्वारी आणि गव्हाचे नुकसान झाले. तर खटाव तालुक्यातील 2 गावांतील 10.70 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, आले व भाजीपाल्याची नासधूस झाली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून अजून जिल्ह्यातील काही तालुक्याचे शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु असून जसजसे पंचनामे होतील तसे हवा सादर केले जात आहेत. ज्या शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे राहिले असतील त्या शेतकर्‍यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.