औरंगाबादेतील शेतकऱ्यांचा शेतीमाल रेल्वेद्वारे होणार निर्यात; पहिली किसान रेल्वे कोलकत्त्याकडे रवाना

kisan train
kisan train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद |  येथून शनिवारी शेतकऱ्यांसाठी पहिली किसान रेल्वे धावली. शेतकऱ्याचा मालवाहतूक करणारी औरंगाबाद येथून ही पहिलीच रेल्वे असून 246 टन कांदा घेऊन ही रेल्वे कोलकत्ताकडे रवाना झाली. रेल्वेद्वारे शेतकऱ्यांचा शेतीमाल विविध ठिकाणी पोहोचत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

शेतकऱ्याचा शेतीमाल कमी खर्चात आणि कमी वेळेत देशातील विविध ठिकाणी पोहोचवण्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने सुरू केलेल्या किसान रेल्वे मोठ्या प्रमाणात नगरसोल येथून धावल्या. औरंगाबाद येथेही किसान रेल्वेला शेतकऱ्यांमधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भविष्यात किसान रेल्वेची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नगरसोल येथून आजपर्यंत सुमारे 200 किसान रेल्वेचा देशाच्या विविध भागात 1747 टन कांदा टरबूज आणि द्राक्षांची वाहतूक झाली आहे. वेळेवर माल विविध ठिकाणी जात असल्याने शेतकरी किसान रेल्वेला प्राधान्य देत आहेत. वेळेवर आणि कमी खर्चात शेतीमाल विविध भागात जात असल्याने शेतकऱ्यांकडून किसान रेल्वेला पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. कलकत्ता येथे सुमारे 246 टन कांदा औरंगाबाद येथील शेतकऱ्यांनी पाठवला आहे. शनिवारी औरंगाबाद येथून जाणारी ही पहिलीच किसान रेल्वे होती आतापर्यंत नगरसोल येथून शेतीमाल न्यू गुहाटी, नावगाचिया, डागकुनी, मालडा टाऊन, गौर माल्दा, अगरटाला, फातुहा, न्यु जलपैगुडी आदी ठिकाणी पोहचविण्यात आला.