कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारीपर्यंत जाहीर होतील- जिल्हाधिकारी दौलत देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, टप्प्याटप्प्यानं याद्या जाहीर केल्या जातील. एप्रिल अखेरपर्यंत ही योजना पूर्ण होईल असं मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं होत. याच अनुषंगाने कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहु नयेत, यासाठी प्रशासन काळजी घेत असून जिल्ह्यातील ५० हजार ६१८ थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास ३७२ कोटी रूपयांची कर्जमाफी केली जाणार आहे. या सर्व शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली असून दिनांक २८ फेब्रुवारीपर्यंत याद्या लाभार्थी शेतकऱ्यांचा याद्या जाहीर करण्यात येतील.

जिल्हा उपनिंबधक अमर शिंदे यांनी या योजनेच्या अंलबजावाणी संदर्भात दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, जिल्ह्यात आज कर्जमुक्ती योजनेतंर्गत आसुर्ले आणि हेर्ले येथे पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या आधार प्रमाणिकरणाच्या कामाचा पथदर्शी योजना शासनाने हाती घेतली असून जिल्ह्यातील उर्वरित पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या याद्या २८ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध केल्या जातील. या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत लावल्या जातील, असेही ते म्हणाले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनीही या याजेनेबद्दल समाधान व्यक्त करून आसुर्ले गावात या योजनेंतर्गत आधार प्रमाणिकरणाचा शुभारंभ केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment