भाव नसल्यनाने तरुण शेतकऱ्याने शेतात साठवून ठेवला 25 टन कांदा..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथिल शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने कांदा चाळ बनवली आहे. तसेच कांद्याला अपेक्षित भाव नसल्याने त्यात 25 टन कांदा साठवून ठेवला आहे. ज्ञानेश्वर पाटील अस या शेतकऱ्याचं नाव आहे. पाटील यांनी आपल्या शेतातील केळीच्या सव्वादोन एकर क्षेत्रामध्ये कांदा लागवड केली आहे. या शेतकऱ्याने कांद्याच्या आंतरपिकापासून ५६ टन कांद्याचे उत्पादन घेतले आहे.

सध्या लॉकडाऊनच्या काळात कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतातील उपलब्ध साहित्यापासून कांदाचाळीची उभारणी करून या कांद्याची साठवणूक करून ठेवली आहे. कृषी पदविकेचे शिक्षण झालेल्या ज्ञानेश्वरने शिक्षणानंतर नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतला. तसेच गावात कृषी सेवा केंद्र सुरू केले. २०१३ पासून शेतीमध्ये मिळालेल्या अनुभवातून वेगवेगळी पिके घेत त्यामधून विक्रमी उत्पादन मिळवले आहे. सध्या त्यांनी आपल्या सव्वादोन एकर क्षेत्रावर केळीचे पीक घेतले आहे. केळी लागवड करण्यापूर्वी पूर्व मशागतीनंतर पंचगंगा फुरसुंगी पुणे जातीच्या फेक पद्धतीने लागवड केली. ठिबक सिंचनच्यासाह्याने पाणी व्यवस्थापन केले. सध्या त्यांच्या या क्षेत्रांमध्ये अंदाजे छप्पन्न टन कांद्याचे उत्पादन मिळाले आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने २५ टन कांदा चाळीत साठवण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या शेतात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून शंभर फुटाची कांदाचाळीची उभारणी केली. त्यांना या कांद्यापासून २० रुपये किलो दर अपेक्षित असून असा दर मिळाल्यास या आंतर पिकातून त्यांना ११लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment