जनावरांचे बाजार बंद, आता बैलगाडी शर्यती थांबल्याच पाहिजेत : आ. बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लम्पी स्किनचा खिलारे गाई, खिलार बैल यांच्यावर जास्त परिणाम होतो, त्यांना पहिले लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे सध्या जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. बैलगाडी शर्यंतींना परवानगी मिळाल्याने सध्या मोठ्या प्रमाणावर खिलार जातीच्या बैलाच्या शर्यंती होत आहेत. तेव्हा शर्यंतीमुळे जनावरे एकत्रित येण्याचे मोठे प्रमाण बैलगाडी शर्यंतीमुळे होत आहे. तेव्हा लम्पी … Read more

वाघेरीत “लम्पी स्किन” आजारामुळे खिलार जातीच्या बैलाचा मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या एक महिन्यापासून ‘लम्पी स्कीन’ या जनावरांच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. कराड तालुक्यातील वाघेरी येथील शेतकरी सुलतान फतुलाल पटेल यांच्या खिलार जातीच्या बैलास या आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. त्याचा आज दुर्दैवी मृत्यू झाला.  राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांना ही बातमी समजताच त्यांनी घटनास्थळी भेट … Read more

व्यापाऱ्यांनो सावधान ! शेतीमालाचे नवे- जुने वर्गीकरण करू नका, अन्यथा लायसन्स रद्द होईल

Satara Bazar Market

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके यावर्षी आले व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याचे आले खरेदी करताना नवे- जुने असे भाग पाडले जाऊन व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. याबाबत भारतीय किसान संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी सातारा शेती उत्पन्न बाजार समितीकडे मागणी केली आहे. त्यास अनुसरून बाजार समितीने आले व्यापाऱ्यांनी नवे- जुने आल्याचा वर्गीकरण दराचा पाडलेला भाग थांबवावा. अन्यथा आपली व्यापारी … Read more

येरळा नदीत पूराच्या पाण्यात वाहून गेलेल्या वृध्दाचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खटाव नजीक असलेल्या येरळा नदीच्या पात्रात एक वृध्द चरायला नेलेली जनावरे घेवून घरी परतताना पूराच्या पाण्यातून वाहून गेल्याची घटना घडली आहे. भिकू आकोबा पाटोळे (वय- 60) असे सदरील इसमाचे नाव असून आज सोमवारी दि. 12 रोजी ते मयत अवस्थेत आढळून आले आहेत. याबाबतची पुसेगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी … Read more

सातारा जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 55 जनावरांना लंम्पी त्वचारोगाची लागण

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात जनावरांच्या लंम्पी आजाराचा शिरकाव झाला असून जिल्ह्यातील फलटण, खटाव, सातारा, कराड तालुक्यात एकूण 55 जनावरे बाधित झाले आहेत. यामध्ये 45 गाईंचा तर 10 बैलांचा समावेश आहे. यासाठी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय विभाग सज्ज झाले आहे. ज्या ठिकाणी जनावरांमध्ये त्वचा रोगाचे संक्रमण दिसून येत आहे. त्या परिसरातील 5 किलोमीटर भागात जनावरांना लसीकरण … Read more

Pm Kisan च्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री किसान योजना लागू होणार; शेतकऱ्यांना मिळणार मोठा लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्यातही शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकार लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षाला ६ हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. यानुसार प्रत्येक महिन्यात टप्प्या टप्प्यानं रक्कम … Read more

लंम्पी त्वचारोगास घाबरु नये, दवाखान्यांशी संपर्क साधा : डॉ. अंकुश परिहार

Lumpy skin

सातारा | लंम्पी त्वचा रोग हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जनावरांना आवश्यकेनुसार लसीकरणासाठी लस व उपचारासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध असून वेळीच उपचार केल्यास हा आजार निश्चित बरा होतो. पशुपालकांनी घाबरुन न जाता नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सातारा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार, … Read more

सार्वजनिक मालमत्ता व शेतीपिकाच्या नुकसानीचे अहवाल तातडीने सादर करा : शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाले असून अजूनही तीन ते चार दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता गृहीत धरुन सार्वजनिक मालमत्ता व शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन लवकरात लवकर एकत्रितच अहवाल सादर करण्यात यावा, म्हणजे आवश्यक ती मदत देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. जिल्ह्यातील झालेल्या … Read more

कराडचा जनावरांचा बाजार बंद : लम्पी स्कीनमुळे बाजार समितीचा निर्णय

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी शेती उत्पन्न बाजार समितीचे बैल बाजार येथे दर गुरुवारी बाजार भरत असतो. मात्र, लम्पी स्कीन या अनुसूचित रोगाचा प्रतिबंध / नियंत्रण व निर्मुलन करण्यासाठी जनावरे बाजार बंद ठेवण्यात आल्या संबधी कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी पत्राद्वारे कळविले आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हा सातारा यांनी दि. 17 … Read more

भाडळेत वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू

कोरेगाव | भाडळे (ता. कोरेगाव) येथे काळवट नावाच्या शेत शिवारात वीज पडून संभाजी सीताराम निकम (वय- 60) या शेतकर्‍याचा मृत्यू झाला. कोरेगाव तालुक्यात सोमवारी दुपारी जोरदार पाऊस कोसळला. भाडळे गावात दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास वीज कोसळली होती. भाडळे येथे जोरदार आलेला पाऊस थांबल्यानंतर काळवट नावाच्या शिवारात संभाजी निकम यांचा मृतदेह नागरिकांना दिसून आला. या घटनेची … Read more