बाहेरच्या राज्यातून येणारे दूध सीमेवरती आडवा; राजू शेट्टी यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
सध्या राज्याच्या सीमा पोलिसांनी बंद केल्या आहेत तेव्हा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यातून येणारे दुधाचे टँकर सीमेवरच अडवण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलीय. जेणेकरून अतिरिक्त दूध खरेदीचा राज्य सरकार वरती बोजा कमी होईल असं राजू शेट्टी आणि म्हटले आहे. ते कोल्हापूरात बोलत होते.

शेतीमाला व्यापाराला राज्याच्या सीमा असू नयेत अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे. मात्र सध्याचा काळ हा असाधारण काळ आहे . यामुळे संपूर्ण देश लॉक डाऊन झालेला आहे. अशा परिस्थितीत दुधाची टंचाई असतानासुद्धा एकाबाजूला ग्राहकांना दूध मिळत नाही तर दुसर्‍या बाजूला उत्पादकांचे दूध खपत नाही ही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या असाधारण काळामध्ये शेतकऱ्यांचं उत्पादित झालेले दूध वाया जाऊ नये म्हणून राज्य सरकारने दररोज दहा लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

अशा परिस्थितीत लॉक डाऊन चा एक भाग म्हणून सगळ्या राज्याच्या सीमा बंद करून ठेवलेले आहेत. सीमेवरती पोलीस आहेत. पोलिसांना कर्नाटक गुजरात आणि मध्य प्रदेश यावरून यावरून येणारे दुधाचे टँकर अडवण्यात सांगावेत अशी विनंती राज्य सरकारला आहे. कारण सध्या राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतले पैसे खर्च करून दूध खरेदी करत आहे अशावेळी काही लोक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी व्यापार करण्यासाठी बाहेरचं दूध घेत आहेत. बाहेरच्या राज्यातून येणारे दुधाचे टँकर सीमेवरच रोखणं गरजेचं असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण

खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी

कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित

निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा

Leave a Comment