हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Agriculture News । राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. शेतीच्या बांधावरून जाणारा शेत रस्ता १२ फुटांचा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्याच्या महसूल व वन विभागाने याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आधुनिक शेतीला मोठी मदत मिळणार आहे. कारण रस्ता मोठा झाल्याने ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, हार्वेस्टर, इत्यादी उपकरणे अगदी आरामात शेतीपर्यंत पोहचू शकतील आणि शेतकऱ्याचं कष्ट थोड्याफार प्रमाणात कमी होईल.
शासन आदेशात काय म्हंटल? Agriculture News
शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे (उदा. ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, हार्वेस्टर, इत्यादी) यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वहनासाठी शेतरस्त्यांबाबत शेतकऱ्याची मागणी व आवश्यकता, स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी / प्राधिकारी यांनी तपासणी करुन पारंपारिक अरुंद शेतरस्त्यांऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करुन द्यावेत.
शेतकऱ्यानी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची (Agriculture News) प्रत्यक्ष पाहणी करुन शेतरस्त्याची आवश्यकता तपासावी. अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग, पाऊलवाटा, इतर वहिवाटीचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी. शेजारच्या भूधारकांच्या वहिवाटीच्या हक्कांचा आणि त्यांच्या अडचणींचा व आक्षेपांचा विचार करावा. सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा शेतरस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करुन देणे शक्य नसेल परंतु रुंद शेतरस्त्याची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा, जरी तो थोडा लांबचा असला तरी चालेल. आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्येच आवश्यकतेनुसार 3 ते 4 मीटर पेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद शेतरस्ता उपलब्ध करुन देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करुन द्यावा.
बांध हे केवळ दोन शेतांच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे बांधावरून रस्ता देतांना त्याचे नैसर्गिक स्वरूप शक्यतोवर टिकवून ठेवावे. रस्त्यांची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी, परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे. तसेच बांधावरून रस्ता (Agriculture News) दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करावी, जेणेकरून भविष्यात सीमांवरून कोणताही वाद निर्माण होणार नाही असं शासनाच्या जीआर मध्ये म्हंटल आहे.
फक्त 2 मिनिटात मोजा तुमची शेतजमीन- Jamin Mojani
शेतकऱ्यांनो, तुम्हाला अगदी फुकट मध्ये आणि फक्त २ मिनिटात तुमची शेतजमीन मोजायची असेल तर चिंता करू नका.. हॅलो कृषी या मोबाईल अँप वरून तुम्ही फक्त २ मिनिटात तुमची जमीन मोजू शकता. त्यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाहीत. तुम्ही आहे त्या जागेवरूनच मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्रफळ मोजू शकता. त्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.
1) सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जावा आणि तिथे Hello Krushi असं सर्च करून ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. Link :https://bit.ly/HelloKrushiApp
2) हॅलो कृषी हे अँप Install झाल्यांनतर सर्वात अगोदर त्यामध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक माहिती टाका .
3) त्यानंतर तुम्हाला ‘हॅलो कृषी’ चे होम पेज दिसले. त्यावरील जमीन मोजणी या पर्यायावर क्लिक करा
4) क्लीक करताच आत्ता तुम्ही कुठे उभे आहात ते लोकेशन तुम्हांला सॅटेलाईटच्या मदतीने दिसेल.
5 ) आता तुमची शेतजमीन नेमकी किती भरतोय हे पाहण्यासाठी डाव्या कोपऱ्यात क्षेत्रफळ आणि लांबी यातील पर्याय निवडा. ( हेक्तर, एकर चौरस मीटर, चौरस किलोमीटर, फूट यार्ड, मैल, गुंठा, बिघा) तर लांबी ही (मीटर, किलोमीटर आणि फूट ) मध्ये येईल.
6 ) आता तुम्हांला जी जमीन मोजायची त्याचे एक – एक अशा चारही कोपऱ्यांवर क्लीक करा.
7 ) आता तुम्ही जेवढे कोपरे निवडले तो संपूर्ण भाग तुम्हांला हिरव्या रंगात दिसेल.
8) त्यांनतर तुम्ही निवडलेल्या संपूर्ण जमिनीचे क्षेत्रफ़ळ आणि लांबी किती आहे याचा अचूक आकडा तुम्हाला दिसेल.
शेतकरी मित्रांनो, हॅलो कृषीवर फक्त जमीनच मोजता (Jamin Mojani) येत नाही तर शेतीशी संबंधित अनेक सोयी – सुविधा तुम्हाला यामध्ये पाहायला मिळत आहे. हॅलो कृषीमध्ये तुम्हाला सातबारा उतारा, रोजचा बाजारभाव, शेतीविषयक सल्ले, रोजचा हवामान अंदाज, शेतकऱ्यांसाठी आणलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी थेट अर्ज, यांसारख्या अनेक सुविधांचा लाभ मिळतोय. तसेच तुम्हाला रोपे खरेदी करता येतील… तुमच्या प्राण्यांची कोणत्याही एजंट शिवाय खरेदी- विक्रीही करता येईल. महत्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. त्यासाठी आजच हॅलो कृषी हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा.




