Agriculture State Award | महाराष्ट्राला कृषी राज्य पुरस्कार जाहीर! एकनाथ शिंदे राहणार कार्यक्रमाला हजर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture State Award | संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्राला 2024 कृषी राज्य पुरस्कार (Agriculture State Award) जाहीर झालेला आहे. या ठिकाणी भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी सदाशिवम हजर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 10 जुलैला नवी दिल्लीत हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाणार आहेत.

10 जुलैच्या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्यासह कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, ब्राझील, अल्जीरिया, नीदरलॅंड देशाचे राजदूत, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड राज्यातील मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र शेतीप्रधान राज्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना महाराष्ट्रात नेहमीच आणल्या जातात. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी या योजना राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 21 लाख हेक्टरवर बांबू लावण्याचा सर्वात मोठा मिशन यावेळी हाती घेण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे 17 लाख हेक्टरवर कृषी सिंचन पाणी पोहोचवण्यासाठी तब्बल 123 योजना राबवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची रक्कम देखील दुप्पट करणार महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. नॅनो तंत्रज्ञानाद्वारे खतांच्या वितरण करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना 4.63 लाखांची मदत केलेली आहे.

याआधी 2023 ला सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार (Agriculture State Award) बिहारला मिळाला आहे. तर 2022 तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशला देण्यात आला होता. साल 2008 ला या पुरस्काराची सुरुवात डॉ. एमएस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखालील समितीत करण्यात आली होती. 2008 चा पुरस्कार आंध्रप्रदेशला देण्यात आला होता.