पर्यावरणपूरक सेंद्रिय वस्तुंच्या व्यापार केंद्राचे पुण्यात उद्घाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शेतकऱ्यांनाही मिळणार हक्काचं व्यासपीठ, १०,००० हजार शेतकरी घेणार सहभाग

पुणे | सुनिल कमल

बदलत्या काळात आपल्या अन्नातील भेसळयुक्त वाढ हळूहळू आकलनशक्तिबाहेरील होत आहे. शेतात वापरल्या जाणाऱ्या रसायनांचे आणि कीटकनाशकांचे प्रमाण चिंतित करण्याजोगे आहे. सेंद्रिय शेती प्रमाणिकरण करण्याचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेत मालाची विक्री होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होते. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन सेंद्रिय शेती करणाऱ्यांना हमी भाव आणि ग्राहकांना कमी भावात माल मिळेल. हाइब्रिड अन्नाविषयक जागरूकता येण्यासाठी सिद्धगिरी स्वास्थ्य संस्था पुढाकार घेऊन पर्यावरण पूरक वस्तुंचे ” अद्रीष ” हे व्यापार केंद्र पुण्यात सुरु करीत आहेत. यासाठी महाराष्ट्रातील तब्बल १०,००० शेतकऱ्यांशी संपर्क करून नोंदणी केली असल्याची माहिती संस्थेचे अक्षय अग्रवाल आणि सौरभ साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, “शेतीमालासोबतच या व्यापारी केंद्रात किराणासामान , स्वंयपाक घरातील उपकरणे, गृहउपयोगी वस्तु , सेंद्रिय वस्त्रे, सौंदर्य प्रसाधने, कापड़ी पिशवी इत्यादि असतील. विशेष म्हणजे या सर्व वस्तूंची सेवा घरपोचही दिली जाणार आहे.
या व्यापार केंद्राचे उद्घाटन शनिवार दिनांक १ सप्टें रोजी सायंकाळी ४ वाजता पुण्यातील ३ सणस कॉर्नर , गल्ली ५ , साउथ मेन रोड , कोरेगाव पार्क येथे कणेरी महाराज मठाचे ( कोल्हापुर ) पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे.

Leave a Comment