Ahmednagar Ashti Train Fire : अहमदनगर- आष्टी रेल्वेला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी मारल्या उड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतीच एक मोठी माहिती समोर आली आहे. अहमदनगर आष्टी रेल्वेला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये (Ahmednagar Ashti Train Fire) रेल्वेचे दोन डबे जळून खाक झाले आहेत. सध्या या आगीला भिजवण्यासाठी अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे, अद्याप या आगीमध्ये जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. तसेच ही आग कशी लागली हे देखील उघडकीस आलेले नाही.

अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल- Ahmednagar Ashti Train Fire

सोमवारी दुपारी अहमदनगर आष्टी रेल्वेला आग लागल्याची समजताच रेल्वेतील प्रवाशांनी उड्या मारून आपले प्राण वाचवले. यानंतर तातडीने रेल्वे विभागाला संपर्क साधण्यात आला. तसेच आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या ही आग विझवण्याचे काम अग्निशामक दलाच्या जवानांकडून सुरू आहे. तसेच, रेल्वेमध्ये कोणते प्रवासी अडकले नाहीत ना याचा देखील तपास करण्यात येत आहे. या सर्व घटनेमुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर, प्रवाशांच्या मनात भीती निर्माण झाली असून परिसरात गोंधळ उडाला आहे.

नेमकं काय घडल?

समोर आलेल्या माहितीनुसार, अहमदनगर आष्टीला दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान आग लागल्याचे म्हटले जात आहे. सुरुवातीला ही आग फक्त रेल्वेच्या दोन डब्यांना लागली होती. मात्र या आगीने मागील डबे देखील आपल्या विळख्यात घेतले. यानंतर आग जास्त भडकली. यानंतर आग लागल्याची माहिती प्रवाशांना मिळाली ज्यामुळे रेल्वेमध्ये गोंधळ उडाला. पुढे आपला जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेमधून उड्या मारल्या. यानंतर लगेच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्याकडून ही आग विझवण्यात सुरूवात झाली. आता ही आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, आज रेल्वेमध्ये गर्दी नसल्याने सुदैवाने कोणालाही इजा नाही. सध्या प्रशासन या आगीचे कारण शोधून काढत आहेत.