महाराष्ट्रातील ‘या’ एकाच ठिकाणी आहेत 2 वेगवेगळ्या नावाची रेल्वे स्थानके

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतात रेल्वे ही सर्वांसाठी योग्य असा प्रवासाचा पर्याय आहे. खिशाला परवडणारा आणि लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त असल्याने अनेकजण रेल्वेला प्राधान्य देतात. रेल्वे जितकी महत्वाची तितकंच महत्वाचे असते ते म्हणजे रेल्वे स्टेशन…. त्यामुळे भारतात रेल्वे स्टेशनची चर्चा सुद्धा तेवढीच होत असते. भारतात वेगवेगळे नावाजलेले रेल्वे स्थानके आहेत मात्र तुम्हाला जर सांगितलं की आपल्या महाराष्ट्रात एकच ठिकाणी दोन वेगळ्या नावाची रेल्वे स्टेशन आहेत तर तुम्हाला ते पटेल का?? हो हे खरं आहे. एकाच ठिकाणी दोन वेगळ्या नावाची ही रेल्वे स्टेशन अहमदनगर जिल्ह्यात आहेत. जाणून घेऊयात या रेल्वे स्टेशनबद्दल.

कोणती आहेत ही रेल्वे स्टेशन?

अहमदनगर जिल्ह्यात हे दोन रेल्वे स्टेशन एकच ठिकाणी वसले असून त्यास दोन वेगळ्या नावाने ओळखले जाते. या स्टेशनची नावे म्हणजे एकाचे नाव बेलापूर तर दुसऱ्याचे नाव श्रीरामपूर असे आहे. हे दोन्ही स्टेशन एकाच ठिकाणी आहेत. त्यामुळे यास एक वेगळे वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. बेलापूर  आणि श्रीरामपूर हीं दोन्ही स्टेशन एकाच ठिकाणी आहेत. त्यामुळे अनेकदा प्रवाश्यांचा गोंधळ उडतो. म्ह्णून या दोन्ही मधला फरक नेमका काय आहे? असा प्रश्न पडतो. यातील फरक एवढाच आहे की, ही दोन स्टेशन एक ट्रॅकच्या विरुद्ध बाजूस आहे. त्यामुळे यातील फरक लक्षात येतो. परंतु तरीही जर तुम्हाला या स्टेशनवरून प्रवास करत असताना तिकीट काढतानाच तुम्हाला ट्रेन कोणत्या प्लेटफॉर्मला येणार आहे हे व्यवस्थित समजून घेणे खूप आवश्यक आहे.

कोणत्या ठिकाणाला जोडले आहे हे स्टेशन?

अहमदनगर मधील या दोन रेल्वे स्टेशनला शिर्डी, अहमदनगर आणि संभाजीनगर हें ठिकाणे जोडले आहेत. तसेच बेलापूर आणि श्रीरामपूर हे स्टेशन शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रवाश्यांना ते सोयीचे पडते.