हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ai+ 5G Mobile Launched । तुम्ही जर कमी किमतीत आणि स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. भारतात अवघ्या ४९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत २ नवे मोबाईल लाँच झाले आहेत. हे मोबाईल Ai+ ब्रँडने बाजारात आणले आहेत. AI+ Pulse आणि Nova 5G असं या दोन्ही स्मार्टफोनची नावे आहेत. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.
Ai+ ब्रँड च्या या दोन्ही मोबाईल मध्ये 6.7-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यातील AI+ Pulse स्मार्टफोन मध्ये T615 चिपसेट बसवण्यात आली आहे तर Nova 5G मध्ये T8200 चिप वापरण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन Android 15 वर आधारित NxtQ OS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतात. यामध्ये NxtPrivacy Dashboard आहे, जे वापरकर्त्यांना त्यांचा डेटा कोणत्या ॲप्सद्वारे ट्रॅक केला जात आहे आणि कसा, याची माहिती देतं. याशिवाय, NxtQuantum PlayStore, NxtQuantum Theme Design Tool, Community App, Community Wallpaper आणि NxtMove App यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. (Ai+ 5G Mobile Launched)
कॅमेरा – Ai+ 5G Mobile Launched
AI+ पल्स आणि Nova 5G च्या कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास, या दोन्ही स्मार्टफोन मध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा मिळतो, तर समोर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5,000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे कि हि बॅटरी जास्त वेळ टिकेल. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, बोलायचं झाल्यास स्मार्टफोन मध्ये Wi-Fi, GPS, Bluetooth, 3.5mm ऑडिओ जॅक आणि USB Type-C पोर्ट यांसारखे पर्याय आहेत.
किंमत किती?
Ai + Pluse च्या ४GB रॅम आणि ६४GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४,९९९ रुपये आहे तर ६GB रॅम आणि १२८GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६,९९९ रुपये आहे. दुसरीकडे, Ai + Nova 5G च्या ६GB रॅम आणि १२८GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,९९९ रुपये आहे तर ८GB रॅम आणि १२८GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे.