हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (AI Chair) निवडणुका जवळ आल्या की, नेते मंडळींना जनता दिसते. मग आश्वासनांचा अगदी पाऊस पडतो. पण निवडणूका संपल्या की, लोकप्रतिनिधींना जनताही दिसत नाही आणि त्यांना दिलेली आश्वासनंसुद्धा आठवत नाहीत. पण आता असं होणार नाही. गेल्या काही काळात विविध क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. याच तंत्रज्ञानाच्या साथीने एका भारतीय विद्यार्थ्याने कमालीची ‘AI चेअर’ बनवली आहे. ही ‘AI चेअर’ भल्याभल्यांना विसर पडलेल्या आश्वासनांची आठवण करून देणार आहे.
कोणी बनवली ‘AI चेअर’? (AI Chair)
लोकप्रतिनिधींनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी ही ‘AI चेअर’ एका भारतीय विद्यार्थ्याने तयार केली आहे. या विद्यार्थ्याचे नाव अंशित श्रीवास्तव असे आहे. गोरखपूरमधील एका कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्याने ही कमाल ‘एआय चेअर’ बनवली आहे. जी नेतेमंडळींसाठी फायदेशीर ठरेल. कारण, या चेअरवर बसताक्षणी नेत्यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण होणार आहे. वृत्तानुसार, ही चेअर जनता खूप संतप्त झाली असेल तर त्याचीही माहिती नेत्यांना देणार आहे.
चेअरवरील सेन्सर्स सांगणार जनता खुश की नाखुश?
अंशितने AI चेअरबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, त्याने ही खुर्ची भावी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवली आहे या AI चेअरवर सेन्सर्स बसवले आहेत. ज्यांच्या सक्रियतेमुळे नेत्यांना संकेत दिले जातील. त्यांच्या कमवा जनता खुश आहे की नाराज? हे देखील या सेन्सर्समुळे समजेल. (AI Chair) या खास खुर्चीवर इंडिकेटर म्हणून लाल आणि हिरवा दिवा बसवण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने नेत्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाईल. अशीही माहिती अंशितने दिली. तसेच हे मूल्यमापन लोक स्वतः करतील आणि त्यांना सोशल मीडिया हॅण्डलच्या माध्यमातून यासाठी गुणांकन दिले जाईल.
‘इतक्या’ खर्चात बनवली AI चेअर
अंशितने दिलेल्या माहितीनुसार, AI चेअरला लाखो लाईक्स मिळाल्यावर ती सक्रिय केली जाणार आहे. अंशितने सांगितल्यानुसार, या चेअरवर देशभक्तीपर गाणी वाजवली जातात. यानंतर जेव्हा लोकांचा संताप वाढतो तेव्हा चेअर हलू लागते. (AI Chair) ही चेअर बनवण्यासाठी अँड्रॉइड स्मार्टफोन, लाल- हिरवे इंडिकेटर, पिन केबल, फायबर चेअर, पीसीबी बोर्ड आणि बॅटरीचा वापर केला आहे. फक्त १५ दिवसात ही चेअर तयार केली असून यासाठी एकूण ३५ हजार रुपये खर्च आला आहे. ‘भविष्यात ही AI चेअर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक स्मार्ट होणार’, असे विधान अंशितचे महाविद्यालय संचालक एन.के.सिंग यांनी केले आहे.