Viral Photo : गर्लफ्रेंडसोबत बोलण्यासाठी तरुणाचा अनोखा कारनामा; VIRAL फोटो पाहून युजर्स म्हणाले, ‘बाईचा नाद…’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Photo) आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी विचित्र चाळे, अतरंगी करामती, जुगाड, डान्स, डायलॉगबाजी असे वेगवेगळे फंडे वापरले जातात. अशा विविध आशयाचे कित्येक व्हिडीओ व्हायरल होतात आणि ट्रेंडिंगमध्ये येतात. अशा या सोशल मीडियावर कधी कोण कशासाठी चर्चेत येईल याबद्दल काहीही पक्कं असं सांगता येणार नाही. तुम्ही सोशल मीडियावर अनेक कपल्सचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होताना पाहिले असतील. कधी कधी प्रेमात वाट्टेल ते करायला तयार कितीतरी रोमिओ त्यांच्या कारामतींमुळे चर्चेत असतात. आताही अशाच एका तरुणाचा फोटो व्हायरल होतोय. जो पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल.

व्हायरल फोटो (Viral Photo)

प्रेम ही अशी भावना आहे जी भल्याभल्यांना वेड लावते. प्रेमात पडलेली व्यक्ती कधीही काहीही करायला तयार असते. प्रेमात आकंठ बुडालेली एखादी व्यक्ती काय काय करू शकते याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. बरीच लोक प्रेमात जीवसुद्धा देतात. असे कितीतरी किस्से, कथा तुम्ही ऐकल्या असतील. अशातच सोशल मीडियावर एका तरुणाचा फोटो व्हायरल होतो आहे. जो मुंबईतील दादर रेल्वेस्थानकावरील असून यात एक तरुण प्लॅटफॉर्मवरील शौचालयावर चढून बसलेला दिसत आहे.

हा तरुण शौचालयावर नुसता बसला नाहीये तर इथे बसून त्याने स्वतःचा फोन चार्जिंगला लावला आहे. (Viral Photo) इतकंच नाही तर फोन चार्जिंगला लावून तो फोनवर बोलताना दिसतोय. यावेळी तो नेमका कोणाशी बोलतोय हे सांगू शकत नाही. पण हा फोटो पाहून अनेकांनी हा तरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत कॉलवर बोलत असेल, असा तर्क लावला आहेत. हा फोटो शेअर करणाऱ्या व्यक्तीने फोटोवर लिहिलंय, ‘एवढी काय इमर्जन्सी असेल बरं’. गंमतीत शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंडिंगमध्ये आला आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हायरल फोटो सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवर marathi.viral_ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा फोटो अनेकांनी पाहिला असून एकापेक्षा एक भन्नाट कमेंट केल्या आहेत. या फोटोवर कमेंट करताना एका युजरने लिहिलंय, ‘तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोलत असेल.. डोन्ट डिस्टर्ब’. (Viral Photo) तर आणखी एकाने लिहिलं, ‘तो त्याच्या बाबूशी बोलत असेल’. अन्य एकाने म्हटले, ‘मुलीची भानगड भावा’. तर आणखी एका युजरने लिहिलंय, ‘बहुतेक त्याच ब्रेकअप होतंय’. अशाच आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय, ‘बाईचा नाद लय बेकार’.