हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | AI Chatbat आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढत चाललेला आहे. ही आपल्या देशातील सगळ्यात मोठे तंत्रज्ञान आहे. ज्याचा वापर आजकाल सगळेचजण करत असतात. अशातच आता महावितरणाकडून देखील तंत्रज्ञानाची तुम्हाला मदत होणार आहे. तुम्हाला जर आता कोणतीही अडचण असली तर तुम्ही थेट एआयशी संपर्क साधून तुमच्या अडचणीचे निरसन करू शकता. म्हणजेच रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित झाला तर तुम्हाला आता तातडीने तक्रार करता येणार आहे. त्यामुळे महावितरण त्यांच्या ग्राहकांसाठी अत्यंत सोयीस्कर अशी ही सुविधा उपलब्ध केलेली आहे.
ऊर्जा चॅटबॉट | AI Chatbat
विजेच्या संदर्भातला ग्राहकांना महावितरण बाबत काही अडचणी असेल, तर तुम्हाला कार्यालयात जाण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांना फोन करून हे प्रश्न देखील आता विचारावे लागणार नाही. ग्राहकांची ही समस्या लक्षात घेऊन होता महावितरणाने ऊर्जा चॅटबॉट एआयतंत्रज्ञानावर आधारित सेवा सुरू केली आहे.
महावितरणाने सुरू केलेली ही सुविधा चॅटबॉट सेवा वेबसाईटवर उपलब्ध दिलेली आहे. हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलवर देखील उपलब्ध आहे. तुम्ही ते डाऊनलोड करू शकता आणि तुम्हाला रात्री विजेच्या बाबत कोणत्याही तक्रारी असल्या, तरी तुम्ही त्यावर संवाद साधून तुमच्या तक्रारीचे निरसन करू शकता.
कोणत्या तक्रारी करता येणार
परंतु तुम्ही या ॲप्लिकेशनवर कोणत्याही तक्रारी करू शकत नाही. तुम्ही केवळ संदर्भात तक्रार नोंदणी घरगुती, व्यवसायिक, कृषी आणि औद्योगिक वीज जोडणीचे मागणी, नवीन वीज जोडणीच्या अर्जाची स्थिती, वीज बिल्स कॅल्क्युलेटर यांसारख्या गोष्टींची माहिती घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला असलेले सगळे प्रश्न विचारू शकता.