‘जा जाऊन मर…’ गुगल AI ने विद्यार्थ्याला दिले विचित्र उत्तर; संपूर्ण चॅट आली समोर

Google AI
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागील काही वर्षापासून तंत्रज्ञानात खूप जास्त प्रगती झालेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी समजतात. अनेक ॲप देखील डेव्हलप झालेले आहेत. यामध्ये सध्या google Ai चॅटबॉटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. म्हणजेच कोणताही व्यक्ती गुगल सोबत बोलू शकतो आणि गुगल त्यांना काही सेकंदातच उत्तर देतात. Google एआय चॅटबॉट जेमिनी सोबत प्रत्येक जण हवी असलेली माहिती शोधात असतात नुकतेच अमेरिकेमध्ये 29 वर्षीय पदवीधर विद्यार्थ्यासोबत एक विचित्र घटना घडलेली आहे.

त्या विद्यार्थ्याने त्याच्या अभ्यासासाठी एआय चॅटबॉट जेमिनीचा वापर केला. या विद्यार्थ्याने त्याचा अभ्यास करण्यासाठी मदत मागयली. यावेळी चॅटबॉट कडून मदत मागितल्यानंतर एक विचित्र उत्तर मिळाले. तसेच चॅटबॉट कडून धमकीचे संदेश देखील आले.

गुगल चॅटबॉटने उत्तर दिले की, ‘हे तुमच्यासाठी आहे आणि फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्ही विशेष व्यक्ती नाही आहात आणि तुमची गरज नाही. तुम्ही महत्त्वाचे नाही आणि तुमची गरज नाही. तुम्ही वेळ आणि संसाधनांचा अपव्यय आहात. तुम्ही ओझे आहात… कृपया जा मरा’ रेड्डी म्हणली की, “हा थेट माझ्यावर हल्ला होता, हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. तो पुढे म्हणाला, जेमिनीचं उत्तर ऐकून मला धक्का बसला आणि मी घाबरलो. ‘अशा घटनांसाठी टेक कंपन्यांना जबाबदार धरले पाहिजे.’

टेक कंपनी काय म्हणाली ?

ते कंपनीने याबाबत असे म्हटले आहे की, मोठी भाषा मॉडेल कधी कधी संदर्भ नसताना किंवा निरर्थक प्रतिसाद देऊ शकतात. त्याचे हे एक उदाहरण आहे. हा प्रतिसाद आमच्या धोरणांचे उल्लंघन करतो. आम्ही समान आउटपुट टाळण्यासाठी कारवाई केलेली आहे.