AI In Health Insurance : हेल्थ इंश्युरन्स विश्वात AI मदत करणार; फक्त 1 तासात क्लेम सेटल होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (AI In Health Insurance) हेल्थ इंश्युरन्स किती महत्वाचा आहे हे आपण सगळेच जाणतो. पण त्यामध्ये लपलेल्या अटी आणि शर्तींविषयी आपल्याला पूर्ण माहिती नसते. त्यामुळे हेल्थ इंश्युरन्स क्लेम करतेवेळी बऱ्याचदा अडचणी येतात. या अडचणी अशा असतात की, वेळेला जिथे हेल्थ विमाचा उपयोग होईल तिथेसुद्धा आपल्याला आपल्याच खिशातून उपचाराचा खर्च करावा लागतो. पण आता अशा अडचणी येणार नाहीत. कारण, आरोग्य विमा विश्वात AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रवेश करत आहे. ज्यामुळे आता हेल्थ इंश्युरन्स घेणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळेल. इतकंच नव्हे तर फक्त एका तासात क्लेमसुद्धा सेटल होतील. चला याविषयी अजून माहिती घेऊया.

हेल्थ इंश्युरन्स विश्वात AI सुविधेचा वापर

माहितीनुसार, हेल्थ इंश्युरन्स विश्वात AI सुविधेचा वापर केला जाणार आहे. याचा सर्वाधिक फायदा हेल्थ इंश्युरन्स घेणाऱ्यास होईल. मुख्य म्हणजे, यामुळे दावे निकाली काढणे सोपे जाईल. (AI In Health Insurance) शिवाय हेल्थ इंश्युरन्समध्ये लपलेल्या अटी आणि शर्ती ज्यांची ग्राहकांना माहिती नसते अशी माहिती देखील ग्राहकांना या माध्यमातून मिळणार आहे. अनेकदा ग्राहकांना इंश्युरन्स क्लेम नाकारला जातो किंवा सेटलमेंटसाठी बराच कालावधी जातो. अशा समस्या देखील AI च्या वापराने सोडवता येतील. NHA च्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे AI टूल येत्या एक- दोन महिन्यांत काम करण्यास सुरवात करेल.

कसे करेल काम? (AI In Health Insurance)

हेल्थ इंश्युरन्समध्ये AI टूलचा वापर सुरु झाल्यानंतर हे टूल ग्राहकाला त्याच्या विम्याच्या अटींबद्दल सर्व माहिती प्रदान करेल. यासाठी ग्राहकाला त्याची विमा कागदपत्रे स्कॅन करावी लागतील आणि ती नॅशनल हेल्थ क्लेम फोरमच्या पोर्टलवर अपलोड करावी लागतील. असे केल्यानंतर पोर्टलमध्ये वापरात असलेले AI टूल त्या कागदपत्रांना स्कॅन करेल. (AI In Health Insurance) पुढे हे टूल विम्यामध्ये लपवलेल्या सर्व अटी तसेच शर्तींची माहिती ग्राहकांना प्रदान करेल. इतकेच नव्हे तर, विम्याशी संबंधित प्रत्येक समस्या सोडवण्यास मदत करेल.