हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल कृषी शिक्षणात खूप मोठे बदल झालेले आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोग शिकवले जातात त्याचप्रमाणे शेतीतील गोष्टी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुलभ पद्धतीने करता येईल. अशातच आता B.sc Agri विद्यार्थी यांना AI, मशीन लर्निंग आणि रोबोटिक्सचा अभ्यास देखील शिकवला जाणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठांमध्ये पदवीचे पर्याय देखील मिळणार आहेत. कृषी शिक्षणात आता भारतीय कृषी संशोधन परिषदेने एक नवीन गोष्ट आणली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात भव्य करियर करण्याच्या विद्यार्थ्यांना खूप स्कोप मिळणार आहे. कारण आता बीएससी एग्रीकल्चरचे विद्यार्थी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि रोबोटिक्स यांसारख्या प्रगत विषयांचा देखील अभ्यास करणार आहेत. जेणेकरून त्यांना नवीन तंत्रज्ञानाची देखील माहिती मिळेल आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना शेती करता येईल.
भविष्यातील गरजा पाहता कृषी शिक्षणात एक मोठा परिवर्तन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आता मल्टिपल एंट्री आणि एक्झिट पोलिसीचा देखील लाभ मिळणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत सहजपणे बदली करता येणार आहे. तसेच पदवीचे स्वरूप देखील बदलण्यात येणार आहे. ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षानंतर बाहेर पडणारे विद्यार्थी आता दहा आठवड्याच्या इंटरशिप नंतर UG प्रमाणपत्र देखील प्राप्त करू शकतील. तर दुसऱ्या वर्षानंतर पदवी सोडणारे विद्यार्थी हे UG डिप्लोमा प्राप्त करण्यासाठी देखील सक्षम असतील.
रोजगाराच्या नवीन संधी
उपमहासंचालक (कृषी शिक्षण) डॉ. आर.सी. अग्रवाल म्हणाले की, कृषी शिक्षण हे केवळ पारंपारिक पद्धतींवर आधारित नसून विद्यार्थ्यांना उद्योजकता आणि रोजगाराच्या नवीन संधींशी जोडले जावे, अशी आमची इच्छा आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे संवादकौशल्य सुधारले जाणार असून, त्यांना नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
आधुनिक विषयांचा अभ्यास आवश्यक आहे
आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी, कृषी विद्यापीठांमधील विद्यार्थी आता स्वत: प्रकल्प तयार करतील आणि ICAR कडून त्यांना आवश्यक मदतही पुरविली जाईल. यासोबतच कृषी क्षेत्रातील विविध क्षेत्रातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि मशिन लर्निंग यांसारख्या आधुनिक विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करणे बंधनकारक असणार आहे.
हे नवे बदल कृषी शिक्षणाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल ठरतील आणि तरुण शेतकऱ्यांना नव्या युगातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार करतील. कृषी शिक्षणाला नवी दिशा देण्याचे आश्वासन देणाऱ्या या उपक्रमांना कृषी मंत्रालयाकडून मंजुरी मिळताच या अधिवेशनापासून या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.