हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि AI आधारित रोबोट्सबाबत अनेकांच्या मनात कुतुहूल आहे. AI मानवी जगासाठी धोकादायक असं मत काही तज्ज्ञांनी यापूर्वीच व्यक्त केलं होते. आता तर येत्या काही काळात रोबोट माणसावर नियंत्रण ठेवू शकतात असा गंभीर इशारा AI फर्मचे संस्थापक इमाद मोस्ताक यांनी दिला आहे. त्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.
बीबीसीच्या एका कार्यक्रमात लॉरा कुएन्सबर्गला दिलेल्या मुलाखतीत इमाद मोस्ताक यांनी म्हंटल की, AI साठी सर्वात वाईट परिस्थिती अशी आहे की त्याचा विस्तार खूप मोठा होऊ शकतो आणि असं झाल्यास येत्या काही काळात रोबोटमध्ये माणसांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता विकसित होऊ शकते. जर आपण आपल्यापेक्षा अधिक हुशार संगणक तयार केले तर पुढे काय होईल याची खात्री देता येत नाही.
यापूर्वी इलॉन मस्क यांनी सुद्धा एआयबद्दल चिंता व्यक्त करून ते थांबविण्याची मागणी केली. एआय आपल्यासाठी सुरक्षित आहे की नाही हे स्पष्ट होईपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा विकास थांबवण्याचा इशारा मस्क यांनी दिला आहे. काही काळानंतर एआय मानवांवर वर्चस्व गाजवू शकते आणि मानवाचे भविष्य धोक्यात येऊ शकते अशी भीती मस्क यांनी यापूर्वीच व्यक्त केली होती.