Tuesday, January 7, 2025

AI Teacher : देशातील पहिली AI शिक्षिका; Video पाहून तुम्हीही चाट पडाल

AI Teacher : आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा वापर सध्या सर्वत्र केला जात आहे. AI हि तंत्रज्ञानाच्या जगातील सर्वात मोठी क्रांती म्हणावी लागेल. आत्तापर्यंत एआयचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. आता याच AI ने भारतीय शिक्षण क्षेत्रात आपले पाऊल टाकलं आहे. कारण केरळच्या एका शाळेत देशातील पहिली AI शिक्षिका रुजू झाली आहे. खास बाब म्हणजे हि शिक्षिका एकूण ३ भाषा बोलू शकते.

MakerLabs Edutech Pvt. Ltd. च्या सहकार्याने विकसित केलेली, Iris ही सुपर-मानवी बुद्धिमत्ता असलेली शिक्षिका आहे. तिरुवनंतपुरममधील KTCT उच्च माध्यमिक विद्यालयात साडी नेसलेली, भारतीय संस्कृती जपणारी Iris नावाची ही AI शिक्षिका खूपच कमी कालावधीत विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाली. तिचा आवाज अगदी महिलेसारखा आहे. Iris ही केवळ केरळमधीलच नव्हे तर देशातील पहिली जनरेटिव्ह AI शाळेतील शिक्षक आहे. विद्यार्थ्यांचा शिकण्याचा अनुभव वाढविण्यासाठी ही AI शिक्षिका डिझाइन केलेली आहे. सोशल मीडियावर या AI शिक्षिकेला विडिओ सुद्धा वाऱ्यासारखा पसरला आहे.

३ भाषा बोलते AI शिक्षिका- AI Teacher

MakerLabs ने Iris चा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये शिक्षणात बदल घडवून आणण्याची क्षमता दाखवण्यात आली आहे. आपल्या पोस्ट मध्ये MakerLabs ने म्हंटल की Iris सह आम्ही खरोखर वैयक्तिकृत शिक्षण अनुभव तयार करण्यासाठी AI च्या सामर्थ्याचा उपयोग करून शिक्षणात क्रांती घडवून आणण्याची योजना आखत आहोत. Iris एकूण ३ भाषांमध्ये संवाद साधू शकते. तसेच विद्यार्थ्यांच्या कोणत्याची प्रश्नांची अचूक उत्तरे ती देते. जेव्हा एखादा विद्यार्थी प्रश्न विचारतो तेव्हा Iris माणसासारखेच उत्तरे देते. मात्र ह्युमनॉइडला ड्रग्ज, सेक्स आणि हिंसा यासारख्या विद्यार्थ्यांसाठी योग्य नसललेया विषयांवर माहिती ठेवण्याचे प्रशिक्षण या AI शिक्षिकेला (AI Teacher) दिले गेले नाही. शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा एमएन यांच्या मते, विद्यार्थ्यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर, 3000 हून अधिक विद्यार्थी असलेली शाळा पुढील शैक्षणिक सत्रात जनरेटिव्ह एआय रोबोट शिक्षकांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे.