हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आपला दबदबा कायम ठेवला आहे. या तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रातील कामे सहज करणे शक्य झाले आहे. आजची हि बातमी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची ठरणार आहे. आता कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि इन्सेंटिव्ह ठरविण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)चा वापर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या तंत्रज्ञानामुळे पारदर्शकता वाढणार आहे. तसेच योग्य कर्मचाऱ्यांची प्रमोशनसाठी निवडले जाणार आहे.
Future of Pay 2025 चा अहवाल –
Future of Pay 2025 अहवालानुसार 10 पैकी 6 कंपन्या म्हणजेच 60 टक्के कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि इन्सेंटिव्ह ठरविण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)चा वापर करण्यास तयार आहेत. हा नवीन बदल येत्या काही वर्षांमध्ये (2028 पर्यंत ) लागू करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याद्वारे पगारवाढ, बोनस आणि इतर फायदे ठरवले जाणार आहेत. यामुळे इन्क्रिमेंट आणि पगाराबद्दल कर्मचाऱ्यांचे टेंशन कमी होणार आहे.
पगार ठरवण्यासाठी Ai चा वापर –
चांगला पगार मिळावा यासाठी अनके कर्मचारी प्रयत्न करत असतात. पण काही अडचणीमुळे ते मागे पडतात. तसेच आम्ही चांगले काम करतो तरीही आम्हाला इन्क्रिमेंट , प्रमोशन, पगारवाढ दिली जात नाही, असा काही कर्मचारी त्या कंपनीवर आरोप करत असतात. हे टाळण्यासाठीच आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी अनेक कंपन्या पगार ठरवण्यासाठी एआय चा वापर करणार आहेत. या निर्णयामुळे न्यायपूर्ण पगार संरचना निर्माण होण्यास मदत होणार आहे.
कंपन्यांचा महत्वपूर्ण निर्णय –
आता बहुसंख्य कंपन्याना स्मार्ट बनावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांना टिकवण्यासाठी कंपन्या एआय, हायब्रिड वर्क मॉडेल्स आणि दीर्घकालीन प्रोत्साहन देणाऱ्या योजनांचा वापर करत आहेत. त्यामुळे येत्या काळात, एआयद्वारे पगार आणि इन्सेंटिव्ह ठरवणाऱ्या कंपन्यांमध्ये पारदर्शकता आणि न्यायपूर्ण पद्धतीला अधिक महत्त्व मिळणार आहे.