समृद्धी महामार्गावरील अपघात रोखणार AI; कसे ते पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Mahamarg) वाहतुकीला चांगली गती मिळाली. राज्यातील हा महामार्ग म्हणजे सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. समृद्धी महामार्गामुळे वाहतूक सोप्पी झाली आहे. मात्र या मार्गावर मागच्या काही दिवसांपासून अनेक मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे यावर काहीतरी उपाय करणे गरजेचे होते. त्यासाठीच MSRDC ने यावर पाऊल उचलले आहे. सातत्याने समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी MSRDC AI या प्रणालीचा वापर करणार आहे. तो कसा ते जाणून घेऊयात.

701 किलोमीटरवर सुरू होणार इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम

समृद्धी महामार्गावर होणाऱ्या सततच्या अपघातामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे त्यावर उपाय करण्यासाठी एमएसआरडीसीने AI चा वापर करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार 701 किलोमीटर मार्गावर इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टिम सुरू करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्यासाठी एमएसआरडीसी एक अनुभवी कंपनीच्या शोधत आहे.

CCTV द्वारे ठेवले जाणार वाहनांवर लक्ष

आयटीएसच्या माध्यमातून ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे तयार करून CCTV कॅमेरे लावले जाणार आहेत. आणि त्याद्वारे मार्गावरील वाहणावर लक्ष ठेवता येणार आहे. त्यासाठी कंट्रोल रूम उभारली जाणार आहे. त्यामुळे ओव्हरटेक आणि लेन क्रॉसिंग करणाऱ्या वाहनांची ओळख करणे सोपे जाणार आहे. तसेच अपघाताच्या वेळीही हा पर्याय फायद्याचा ठरणार आहे. सध्या राज्यात सगळ्यात मोठ्या हायवेवर गाड्यावर्ती लक्ष ठेवण्यासाठी क्विक रेस्पॉन्स व्हेहीकल आणि आरटीओ तसेच हायवे पोलीस नजर ठेवतात.