AI मुळे लोकसंख्या घटणार; पृथ्वीवर फक्त 10 कोटी माणसे राहणार

AI Population
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AI म्हणजेच आर्टिफिशल इंटीलिजन्सचा वापर आजकाल प्रत्येक क्षेत्रात केला जातो. AI मुळे माणसाच्या अनेक गोष्टी सोप्प्या झाल्या आहेत, अनेक कामे पटापट होत आहेत. मात्र हेच AI हे माणसासाठी घातक असून त्याच्यामुळे नोकऱ्यांवर गदा येईल अस मानणारा सुद्धा एक वेगळा वर्ग आहे. त्यामुळे एआय वर सातत्याने संशोधन होत असत, तसेच त्याचे फायदे तोटे आजही निरखून बघितले जातात. त्यातच आता AI बद्दल खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. AI मुळे लोकसंख्या घटण्याची शक्यता असून २३०० पर्यंत पृथ्वीवर फक्त १० कोटी माणसे राहू शकतात असं भाकीत अमेरिकेतील एका तज्ज्ञाने केला आहे.

ओक्लाहोमाच्या स्टिलवॉटर येथील ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये संगणक विज्ञान शिकवणारे सुभाष काक असं या तज्ञाचे नाव आहे. न्यू यॉर्क पोस्टनुसार, काक यांनी म्हंटल, कि जागतिक समाजासाठी AI हे विनाशकारी ठरणार आहे, लोकांना याची साधी जाणीवही नाही. संगणक किंवा रोबोट कधीही जाणीवपूर्वक काम करणार नाहीत, परंतु ते आपण जे करतो तेच ते करतील कारण आपण आपल्या आयुष्यात जे काही करतो ते बहुतेक बदलले जाऊ शकते, आपल्या कामाची जागा AI घेऊ शकते असं सुभाष काक यांनी म्हंटल.

एआय मुळे माणसाचा जन्मदर कमी होईल कारण लोक बेरोजगार राहण्यासाठी तयार असलेली मुले जन्माला घालण्यास इच्छुकच नसतील. जागतिक लोकसंख्येला यामुळे मोठा धक्का बसेल. जर लोकांनी आपत्य घालण्याचेच बंद केलं तर आपोआपच जगाची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात कमी होईल आणि २३०० पर्यंत पृथ्वीवर फक्त १० कोटींचं माणसे राहू शकतील असं काक यांनी म्हंटल. यावेळी त्यांनी युरोप, चीन, जपान आणि दक्षिण कोरियामधील घटलेल्या लोकसंख्येचं उदाहरण दिले. मी असे म्हणत नाही की हे ट्रेंड चालू राहतील, परंतु त्यांना उलट करणे खूप कठीण आहे कारण बरेच लोक विविध कारणांमुळे मुले जन्माला घालतात असेही शेवटी सुभाष काक यांनी सांगितलं.