Air India ची जबरदस्त ऑफर; फक्त 1,799 रुपयात करू शकता देश-विदेशात विमानाने प्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| टाटा समूहाच्या (Tata Group) एअर इंडिया (Air India) कंपनीने आपल्या प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये एअर इंडियाच्या प्रवाशांना फक्त 1,799 रुपयांमध्ये देशात आणि विदेशात प्रवास करता येणार आहे. ही ऑफर फक्त 4 दिवसांसाठी लागू असणार आहे. या ऑफरचा लाभ प्रवाशांना 2 फेब्रुवारीपासून ते 5 फेब्रुवारीपर्यंत घेता येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही देखील या काळात प्रवास करण्याचा विचार करत असाल तर एअर इंडियाच्या या ऑफर्स नक्की लाभ घ्या.

ही ऑफर कधी पर्यंत असेल? (Air India)

सध्या एअर इंडिया कंपनी ग्राहक संख्या वाढवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ऑफर प्रदान करत आहे. याचाच एक भाग म्हणून आता देखील एअर इंडियाने हे नवीन ऑफर आणले आहे. या ऑफरचा लाभ तुम्ही 2 फेब्रुवारी ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत घेऊ शकता. तर 2 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारीपर्यंत तिकिट बूक करू शकता.

तिकिट कितीपासून सुरू?

एअर इंडियाच्या (Air India) ऑफरनुसार, देशांतर्गत फिरण्यासाठी इकॉनॉमी क्लासचे तिकीट 1,799 रुपयांपासून सुरू होत आहे. तर बिझनेस क्लासचे भाडे 10,899 रुपये आहे. तर, आंतरराष्ट्रीय इकॉनॉमी क्लासचे भाडे 10,899 रुपये आहे. या ऑफर अंतर्गत इकॉनॉमी भाडे 3,899 रुपयांपासून सुरू होत आहे. परंतु काही ठिकाणी जाण्यासाठी इकॉनॉमी क्लासचे भाडे 9,600 रुपये आहे.

कुठे फिरता येणार?

एअर इंडिया एअरलाईननुसार (Air India), या ऑफर अंतर्गत तुम्ही अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, युरोप, ऑस्ट्रेलिया, आखाती देश तसेच मध्य पूर्व, आशिया पॅसिफिक आणि दक्षिण आशियासाठी तिकिटे बुक करू शकता. तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला एअर इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. या वेबसाईटवर सर्व माहिती तपासून तुम्ही बुकिंग करू शकता.