Air India Express : बंपर ऑफर! रेल्वेच्या तिकिट दरात देशांतर्गत विमानप्रवास; आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठीही सवलतीचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Air India Express ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास आणि मर्यादित कालावधीसाठी आकर्षक ‘फ्लॅश सेल’ जाहीर केला आहे. या सेलअंतर्गत देशांतर्गत प्रवासासाठी तिकीट फक्त 1250 रुपयांपासून उपलब्ध आहे, तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तिकीट केवळ 6131 रुपयांपासून सुरू होणार आहे. स्वस्तात विमानप्रवास करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

Air India Express च्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत मार्गांवर ‘Xpress Lite’ प्रवासासाठी तिकीट 1250 रुपये या किमतीपासून सुरू होत आहे. या प्रकारात चेक-इन बॅगेचा समावेश नसतो. दुसरीकडे, ‘Xpress Value’ या पर्यायाची सुरुवात 1375 रुपयांपासून होत आहे. या तिकिटांची बुकिंग Air India Express च्या अधिकृत वेबसाईटवर, मोबाईल अ‍ॅपवर तसेच इतर प्रमुख बुकिंग प्लॅटफॉर्मवर करता येते.

फ्लॅश सेल अंतर्गत आंतरराष्ट्रीय मार्गांवरही विशेष सवलती दिल्या जात आहेत. ‘Xpress Lite’ श्रेणीतील तिकिटाची सुरुवात 6131 रुपये, ‘Xpress Value’ साठी 6288 रुपये आणि ‘Xpress Flex’ साठी 7038 रुपये इतकी आहे. ही ऑफर 6, 12 आणि 20 ऑगस्ट 2025 या ठराविक तारखांसाठीच लागू आहे.

कंपनीने स्पष्ट केले आहे की, ‘Xpress Lite’ बुकिंगसाठी कोणतीही कंविनियन्स फी आकारली जाणार नाही. या प्रकारातील तिकिटांवर 3 किलोपर्यंत अतिरिक्त कॅबिन बॅग विनामूल्य बुक करण्याची सुविधा दिली जात आहे. मात्र, देशांतर्गत प्रवासात 15 किलो चेक-इन बॅगसाठी 1000 रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवासात 20 किलो बॅगेसाठी 1300 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.

या’ नव्या रेल्वे मार्गाला मिळाली गती! महाराष्ट्रातील 21 गावांमध्ये भूसंपादन सुरू

Air India Express ने लॉयल्टी मेंबर्ससाठी देखील खास सवलती जाहीर केल्या आहेत. लॉग-इन केलेल्या मेंबर्सना 10 किलो एक्स्ट्रा चेक-इन बॅग आणि 3 किलो एक्स्ट्रा कॅरी-ऑन बॅगवर 25 टक्के सूट मिळणार आहे. याशिवाय, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, डॉक्टर, नर्स, सैन्यदलाचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठीही विशेष सूट आणि फायदे दिले जात आहेत.

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी अंतिम तारीख 25 मे 2025 ही आहे. त्यामुळे ज्यांना कमी खर्चात प्रवास करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही एक अत्यंत चांगली संधी ठरू शकते. अधिक माहितीसाठी Air India Express ची अधिकृत वेबसाईट airindiaexpress.com यावर भेट देता येईल.

(टीप: ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून तिकीट बुक करताना अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात.)