Air India Express | एअर इंडिया एक्सप्रेस त्यांच्या कस्टमरसाठी नेहमीच वेगवेगळ्या ऑफर देत असते. अशातच आता एअर इंडिया एक्सप्रेसने एक नवीन ऑफर जारी केलेली आहे. या ऑफर मध्ये तुम्हाला केवळ 932 रुपयांपासून फ्लाईट टिकिट बुक करता येणार आहे. ही एअर इंडियाची ऑफर केवळ 16 सप्टेंबर पर्यंत उपलब्ध असणार आहे. तसेच तुम्ही या ऑफरमध्ये 31 मार्च 2025 पर्यंतच प्रवास करू शकता. आपल्या देशात साजरे होणारे सण उत्सव भविष्यातील ट्रीप या सगळ्याचा विचार करून आता एअर इंडियाने (Air India Express) मल्याळी प्रवासी कोची बेंगलोर, बेंगलुरु चेन्नई, दिल्ली गुवाहाटी यांसारख्या ठिकाणी कमी पैशावर फ्लाईट टिकिट ऑफर केलेले आहेत.
तुम्हाला एअर इंडिया एक्सप्रेसच्या (Air India Express) वेबसाईटवरून यासाठी बुकिंग करता येणार आहे. तसेच तुम्ही जर प्री बुकिंग केले, तर तुम्हाला तीन किलो अतिरिक्त केबिन बॅगेज पूर्णपणे मोफत असणार आहे. या प्रवासात तुमच्या पैशांची देखील बचत होणार आहे. त्यामुळे ही ऑफर तुमच्यासाठी अत्यंत चांगली ऑफर आहे. तसेच जास्त सामानाची आवश्यकता असलेल्यांना चेक इन पर्याय देखील उपलब्ध आहे. देशांतर्गत फ्लाईटमध्ये तुम्हाला 15 किलो अधिक सामान घेता येणार आहे. यासाठी तुम्हाला केवळ 1000 रुपये द्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय फ्लाईटमध्ये तुम्हाला 20 किलो जास्त सामान घेता येणार आहे. यासाठी तुम्हाला केवळ 1300 रुपये खर्च येणार आहे.
या फ्लाईटमध्ये तुम्हाला अनेक लोकप्रिय ठिकाणी जाता येणार आहे. ज्या ठिकाणी लोक वारंवार प्रवास करतात कोची ते बेंगळूरु असा एक छोटा प्रवास असणार आहे. तसेच दिल्ली ते ग्वाल्हेर असा लांबचा प्रवास तसेच सवलतीच्या खर्चामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत त्याचप्रमाणे मित्रांसोबत फिरायला जाणे अत्यंत सोपे होणार आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसची ही ऑफर केवळ 16 सप्टेंबर पर्यंत उपलब्ध असेल. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फ्लाईट बुक करा आणि या ऑफरचा फायदा घ्या. यासाठी अत्यंत कमी खर्च येणार आहे. तसेच एक सर्वसमावेश पॅकेज देखील तुम्हाला मिळेल आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे या अंतर्गत प्रवास करू शकता. तुम्ही केवळ 932 रुपयांपासून सुरू होणाऱ्या तिकिटांसह तुमची फ्लाईट बुक करू शकता. सणासुदीच्या काळात भारतीयांना परवडणाऱ्या दरात एअर इंडियाने ही एक खास ऑफर उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्हाला जर तुमच्या कुटुंबाला घेऊन एखाद्या ठिकाणी फ्लाईटने भेट द्यायची असेल, तर ही तुमच्यासाठी अत्यंत चांगली संधी आहे. तुम्ही लवकरात लवकर एअर इंडियाच्या एक्सप्रेस वेबसाईटला किंवा मोबाईल ॲपद्वारे फ्लाईट बुक करू शकता.