Air India Express : 15 ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदाचा हा 77 वा स्वातंत्र्यदिन असणार आहे. यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एवढेच नाही तर ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट सह सर्वत्र काही ना काही ऑफर्स सुरु होतात. याचप्रकारे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने टाटाच्या एअर इंडिया एक्सप्रेसने फ्रीडम सेल (Air India Express) सुरू केला आहे. या सेल अंतर्गत तुम्ही केवळ २००० रुपयांच्या आत विमान प्रवास सुरु करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या ऑफर बद्दल…
15 आंतरराष्ट्रीय आणि 32 देशांतर्गत उड्डाणांचा समावेश
म्हणजेच एअर इंडिया एक्सप्रेसचे सुरुवातीचे भाडे 1947 रुपये असेल. या ऑफर चा कालावधी मर्यादित असून तुम्ही केवळ 30 सप्टेंबर 2024 पर्यंत या ऑफर चा लाभ घेउ शकता. एअर इंडियाची ही ऑफर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही (Air India Express) ठिकाणांसाठी आहे. यामध्ये दिल्ली-जयपूर, बेंगळुरू-गोवा आणि दिल्ली-ग्वाल्हेर सारख्या लोकप्रिय मार्गांचा देखील समावेश आहे. एअर इंडिया एक्सप्रेस ही ऑफर 15 आंतरराष्ट्रीय आणि 32 देशांतर्गत उड्डाणांसाठी देत आहे.
झिरो चेक-इन बॅगेज (Air India Express)
या कालावधीत प्रवासी एक्सप्रेस लाईटच्या सुविधेचा सुद्धा आनंद घेऊ शकतात. यासाठी प्रवाशांना विमान कंपनीच्या वेबसाइटवरून तिकीट बुक करावे लागेल. या अंतर्गत, तुम्ही झिरो चेक-इन बॅगेज शुल्काचा लाभ घेऊ शकता. एक्सप्रेस लाइटच्या (Air India Express) भाड्यांमध्ये कोणतेही शुल्क न घेता अतिरिक्त 3 किलो केबिन बॅगेजची प्री-बुकिंग करण्याचा पर्याय आणि देशांतर्गत फ्लाइटसाठी 15 किलोसाठी 1000 रुपये आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठी 20 किलोसाठी 1300 रुपये सवलतीचे चेक-इन बॅगेज शुल्क यामध्ये समाविष्ट आहे.
नेहमी प्रवास करणाऱ्यांकरिता अतिरिक्त सवलत (Air India Express)
त्याच वेळी, एअर इंडियाच्या नेहमीच्या सदस्यांना अतिरिक्त सवलत मिळेल. लॉयल्टी सदस्य एअर इंडियाच्या वेबसाइटवरून (Air India Express) केलेल्या तिकीट बुकिंगवर ८% पर्यंत न्यूकॉइन मिळवू शकतात. याशिवाय, तुम्ही ॲड-ऑन पॅकवर बिझ आणि प्राइम सीट, गरम जेवण, थंड पेय आणि मिठाईचा आनंद घेऊ शकता. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, परिचारिका आणि सशस्त्र दलाचे सदस्य (आणि त्यांचे आश्रित) देखील या सवलतीचा लाभ घेऊ शकतात.