Air india ची अनोखी ऑफर : फक्त 1700 रुपयांमध्ये फ्लाइट तिकीट, 50 हून अधिक ठिकाणांना देता येणार भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्यांना स्वस्तात परदेशवारी करत फिरायला जायचे आहे, अशांसाठी टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडिया एक स्वस्तात मस्त अशी अनोखी ऑफर घेऊन आले आहे. कंपनीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत प्रवाशांसाठी फक्त 1705 रुपयांच्या तिकिटात 50 ठिकाणे फिरण्याची ऑफर जारी केली असून हि ऑफर केवळ कमी दिवसासाठी आहे.

एअर इंडियाने वर्षातील सर्वात स्वस्त तिकिटांची घोषणा केली असून ही सवलतीची तिकिटे इकॉनॉमी क्लासमध्ये उपलब्ध असणार आहे. या तिकीट विक्रीदरम्यान, यादीमध्ये 49 हून अधिक शहरे जोडली गेली आहेत. जेणेकरून तुम्ही या ठिकाणांना तुमच्या आवडीनुसार आरामात जाऊ शकता. कंपनीने फक्त 1705 रुपयांमध्ये हवाई प्रवासाची अनोखी ऑफर देत प्रवाशांना एक प्रकारे गिफ्टच दिल्यासारखे आहे.

तुम्‍हीही जर तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या हॉलिडे टूरचे नियोजन करत असाल किंवा तुमच्‍या व्‍यवसाय प्रवासाची योजना असल्‍यास एअर इंडियाच्‍या विस्‍तृत देशांतर्गत नेटवर्कवर या सवलतीच्‍या तिकिटांचा लाभ तुम्हाला घेता येईल. कंपनीची ही ऑफर देशांतर्गत उड्डाणांवर लागू करण्यात आलेली आहे.

एअर इंडियाने दिलेली हि ऑफर कमी कालावधीसाठी आहे. हि ऑफर शनिवार 21 जानेवारीपासून सुरू झाली असून 23 जानेवारीपर्यंत वैध आहे. एअरलाइनच्या अधिकृत ट्रॅव्हल एजंटसह सर्व एअर इंडिया बुकिंग प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी हि उपलब्ध करण्यात आलेली आहे. या ऑफर अंतर्गत बुक केलेल्या तिकिटावर तुम्ही 1 फेब्रुवारी ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंतच्या प्रवासाची योजना करू शकता.