हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Air India Flight। एअर इंडियाचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे. १८० प्रवाशांऐवजी विमान फक्त १५५ प्रवाशांना घेऊनच हवेत उडाले. इतर प्रवाशी तसेच विमानतळावर अडकून पडले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आसनांच्या कमतरतेमुळे अनेक प्रवाशांना मुंबईला जाता आले नाही, तर आधीच बुकिंग करूनही सीट न मिळाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली. नेमक वाक्य घडलं ते आपण पाहूयात…
नेमकं काय घडलं? Air India Flight
एअर इंडियाच्या भूजहून मुंबईला जाणाऱ्या विमानामध्ये हा गोंधळ झाला. हे विमान १८० प्रवाशाना घेऊन मुंबईला जाणार होते, १८० तिकिटेही बुक झाली होती. मात्र ऐनवेळी १५५ जणांनाच घेऊन या विमानाने मुंबईच्या दिशेने उड्डाण केलं. यामुळे ज्यांना विमानात बसता आलं नाही त्या प्रवाशांनी गोंधळ केला. प्रवाशांनी एअर इंडिया एअरलाईनवर ‘गैरव्यवस्थापना’चे गंभीर आरोप केले. आगाऊ बुकिंग करूनही जागा मिळाली नाही, तसेच एअर इंडियाने कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी बघायला मिळाली. विमान प्रवास न करता आल्याने प्रवाशांचे पुढचे नियोजनही बिघडलं.
प्रवाशांनी जेव्हा याबाबत एअरलाइन अधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की १८० आसने असलेले विमान (Air India Flight) मुंबईला जाण्यासाठी येणार होते, परंतु १५५ आसने असलेले विमान आले. कदाचित विमानात काही समस्या असेल, म्हणून विमान बदलण्याचा निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात आला. एअरलाइन अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या राहण्याची व्यवस्था एका खाजगी हॉटेलमध्ये केली आहे. तसेच, प्रवाशांना त्यांची फ्लाइट पुन्हा शेड्यूल करण्याची किंवा परतफेड करण्याची ऑफर देण्यात आली आहे.मात्र प्रवाशांचे पुढचं सगळं नियोजन फिस्कटलं आहे. काही जणांना मुंबईतील नातेवाईकांच्या घरी कार्यक्रमानिमित्त जायचं होते, काहींना ऑफिसला कामावर जायचं होते. मात्र ऐनवेळी विमानाने दगा दिल्याने त्यांचं सगळं प्लॅनिंग फिस्कटलं.
दरम्यान, अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांना (Air India Flight) कायमच कोणता ना कोणता प्रॉब्लेम येताना दिसतोय. अलिकडेच टोकियोहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमान AI357 ला कोलकाता येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले… त्यापूर्वीही सलग ३-४ दिवस कुठे ना कुठे एअर इंडियाच्या विमानांचे इमर्जंसी लँडिंग करावं लागलं होते. त्यामुळे एअर इंडियाच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.