Air India लवकरच सुरु करणार मुंबई ते भुज विमानसेवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एयर इंडिया (Air India) ही भारतातील सर्वात चांगल्या विमान कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमानाचा पर्याय प्रवाश्यांसाठी महत्वाचा ठरतो. त्यातच जर एयर इंडियासारख्या सुरक्षित विमान सेवेचा लाभ मिळाला तर प्रवास हा आरामदायक होतो. देशभरात एअर इंडियाची विमाने अनेक ठिकाणी उड्डाणे घेत असून ग्राहकांना आपली सेवा देत असतात. यात आता आणखी वाढ करत कंपनी भुज ते मुंबई (Bhuj To Mumbai Flight)  अशी विमानसेवा येत्या काळात सुरु करणार आहे.

1 मार्च 2024 पासून सुरु होणार सेवा

एयर इंडियाची भुज ते मुंबई अश्या मार्गावरील सेवा कधी सूरु होणार याकडे सर्वांचे लक्ष असताना ही सेवा 1 मार्च 2024 रोजी सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. भुज ते मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरु करण्याची अनेक दिवसांची मागणी आता लवकरच पूर्ण होणार असून प्रवाश्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. एयर इंडियाची ही विमानसेवा देणारे A320 प्रकारचे सिंगल आयल विमान, AI 601 मुंबईतून 07:05 वाजता निघेल आणि 08:20 वाजता भुजमध्ये पोहोचेल आणि विमान AI602 भुजमधून 08:55 वाजता निघेल आणि मुंबईत 10:10 वाजता पोहोचेल. त्यामुळे एयर इंडियाच्या नव्या प्रयोगाला प्रवाश्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे गरजेचे आहे.

काय फायदा होईल?

एयर इंडियाच्या या नव्या सेवाचा फायदा हा इंग्लंड, उत्तर अमेरिका तसेच दुबई आणि सिंगापूर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाश्यांना होणार आहे. कारण यामुळे आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला चालना मिळणार आहे. ही सेवा देशातील 20 ठिकाणी जोडली जाणार आहे. या नव्या विमान सेवेचा फायदा घेण्यासाठी तुम्ही एयर इंडियाच्या वेबसाईटवर जावून तिकीट बुक करू शकता.