Air India चे नवीन Airbus A320neo विमान भारतात दाखल; फोटो पाहून म्हणाल, क्या बात है!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Air India एअरलाईन्सचे जानेवारी 2022 मध्ये टाटा सन्सच्या माध्यमातून भारत सरकारकडून अधिग्रहण करण्यात आले. त्यानंतर  एअर इंडिया एअरलाईन्सचे रुपडे बदलून नवीन रूपात एअर इंडिया एअरलाईन्स जनसेवेत येईल अशी घोषणा  करण्यात आली. यानंतर आता नवीन एअरबस A320neo नवी दिल्लीत पोहोचले असून लवकरच एअर इंडियाच्या ताफ्यात जॉईन होईल.

Air India ने Airbus A320neo विमानाची छायाचित्र X. Com वरील अकाउंटच्या माध्यमातून प्रकाशित  केली आहेत. यावेळी एअर इंडियाने म्हंटल कि, आमच्या नवीन एअरबस A320neo, VT-RTF ची एक झलक आहे, जी आज दिल्लीत दाखल झाली आहे. आम्ही तुमचे स्वागत करण्यासाठी आणि वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी आता अजून स्वतःला रोखू शकत नाही. एअर इंडियाने यापूर्वी A350 विमानाचे फोटो सुद्धा असच शेअर केले होते. हे विमान फ्रान्समधील टूलूस येथील एअर इंडियाच्या कार्यशाळेतील आहेत.

400 मिलियन डॉलर इतका  खर्च

कंपनीने  Air India च्या फ्लिटमध्ये असलेल्या सर्व विमानांचे डागडुजी व रंगारंगोटी करण्यासाठी 400 मिलियन डॉलर इतका खर्च करण्यात येणार आहे. अंतरराष्ट्रीय बाजारात एअर इंडियाला स्थान बळकट करण्यासाठी व एअर इंडियाच्या प्रवाश्यांना उत्तम सुविधा देण्यासाठी कंपनी एव्हडा खर्च करत असल्याचे  सांगत आहे.

Air India ने तब्बल 70 बिलियनची दिली ऑर्डर

एअर इंडियाने आपल्या फ्लिट मधील विमानांची संख्या वाढवण्यासाठी जून महिन्यात विमान खरेदीसाठीची बलाढ्य अशी ऑर्डर कंपनीने विमान बांधणी  करणाऱ्या बॉईन्ग आणि एअरबस या कंपन्यांना दिली होती. एअर इंडियाने दिलेली ऑर्डर तब्बल 70 बिलियन असून यामध्ये 250 एअरबस आणि 220 बॉईन्ग कंपनीचे विमान मागवण्यात आले आहेत. या दिलेल्या ऑर्डरनुसार पहिले विमान नव  दिल्ली येथे हजर झाले आहे. A320neo हे नवेकोरे विमान दिल्ली येथील  विमानतळावर दाखल  झाले आहे. लवकरच हे विमान एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल करण्यात येईल अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे.