हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जसे जागतिकीकरण, खाजगीकरण वाढले आहे. त्यामुळे निसर्गाची दिवसागणिक स्थिती बदलत आहे. वाढलेल्या इंडस्ट्रीज, कारखाने, बांधकाम ह्यासारख्या गोष्टीमुळे धूळ, धूर ह्यामुळे प्रदूषण वृद्धिंगत होत आहे. तसेच प्लास्टिक, कचरा यामुळेही वातावरणात प्रदूषण वाढण्यास मदत होते आणि वाढते प्रदूषण हे मानवी आरोग्यास हानिकारक बनत चालले आहे. त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊ.
1) मास्क वापरा :
कोरोना काळात मास्कने प्रचंड मदत केली. कोरोनामुळे मास्क काय असतो हे सामान्य माणसापर्यंत पोहोचले. परंतु मास्कचा उपयोग केवळ ह्याच काळात नव्हे तर आजच्या वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. सध्या प्रदूषण हे मोठ्याप्रमाणात वाढत आहे. त्यासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर हा आवर्जून करावा. त्यामुळे श्वास घेताना कोणतेही प्रदूषक शोषून घेण्यापासून रोखले जाऊ शकतात. आणि त्यामुळे होणाऱ्या आजारापासून तुम्ही वाचू शकता.
2) हात, पाय स्वच्छ धुवा:
बाहेरून आल्यावर हात आणि पाय व्यवस्तीत स्वच्छ धुवावे. जेणेकरून आपल्याला शरीरावर जे जंतू साचले आहेत. ते वाढून इतरांना त्याचा त्रास होऊ नये. त्यासाठी हँडवॉश, साबण ह्यासारख्या गोष्टींचा वापर करावा.
3) कोमट पाणी प्या :
सध्या हिवाळा सुरु झाला असून सर्दी, खोकला ह्यासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे दरदरोज कोमट पाणी पिल्यास छोट्या – छोट्या आजारांना पळवता येते. तसेच धुळीने साचलेले घश्यातील कण पाण्यामुळे निघून जातात.
5) गरम पाण्याची वाफ घ्या :
कोमट पाण्याबरोबरच गरम पाण्याची वाफ ही प्रदूषणापासून होणाऱ्या आजारावर रामबाण उपाय आहे. ह्यामुळे होणारे श्वसनाचे विकार थांबले जातात. घसा दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे हे गरम वाफेमुळे दुर होऊ शकते.
6) आयुर्वेदिक चहा प्या :
आयुर्वेदिक चहा म्हणजे काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर आयुर्वेदिक चहा म्हणजे तुळस, अश्वगंध, आलं, लवन्ग, विलायची ह्या सगळ्यांची पूड करून ती चहा मध्ये मिक्स करून तो चहा पिल्यास आजारापासून त्याचा बचाव होतो.