Air Strike On Pakistan : पाकिस्तानवर हवाई हल्ला!! 90 पेक्षा जास्त दहशतवादी ठार

Air Strike On Pakistan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्याचा बदला अखेर घेतला आहे. भारतीय हवाई दलाने काल रात्री 1.30 वाजता पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त (Air Strike On Pakistan) केले. भारताने पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील अनेक भागात क्षेपणास्त्रे डागली. या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं आहे.हे तिन्ही सैन्य दलांच जॉइंट ऑपरेशन होतं. रात्रीच्या अंधारातच पाकिस्तानमधील या दहशतवाद्यांना कायमस्वरुपी गाढ झोपेत पाठवण्यात आलं. तब्बल ९० पेक्षा जास्त दहशतवादी या एअर स्ट्राईक मध्ये ठार झाल्याचं बोललं जातंय.

भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक?

1. बहावलपूर
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर

2. मुरीदके
लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
सीमेपासून 30 किमी अंतरावर

3. सवाई
लश्कर-ए-तोयबाचा अड्डा
सीमेपासून 30 कि.मी.दूर

4. गुलपूर
दशतवाद्यांचा अड्डा 
ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर
हल्ल्यावेळी 80 दहशतवादी 

5. बिलाल
जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ
सीमेपासून 35 कि.मी.दूर

6. कोटली
नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर
50 दहशतवादी उपस्थित होते.

7. बरनाला
दहशतवाद्यांचा अड्डा 
सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर 

8. सरजाल
जैश-ए-मोहम्मद चा अड्डा 
सीमेपासून 8 कि.मी.दूर

9. महमूना
हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र
सीमेपासून 15 कि.मी.दूर

हे पण वाचा : Operation Sindoor ची इनसाईड स्टोरी; कोणी आखला प्लॅन?

जैश चे मुख्यालय उध्वस्त

या ऑपरेशन सिंदूर मध्ये जैश ए मोहम्मदचे मुख्यालय उध्वस्त करण्यात आलं आहे. हाफिज सईदचे अनेक दहशतवादी या हल्ल्यात ठार झाले आहेत. १९९९ मध्ये अपहरण केलेल्या आयसी-८१४ च्या प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहरची सुटका झाल्यानंतर बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मद दहशतवादी गटाचे केंद्र बनले. तेव्हापासून, २००१ मध्ये संसदेवर हल्ला, २००० मध्ये जम्मू आणि काश्मीर विधानसभेवर हल्ला, २०१६ मध्ये पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला आणि २०१९ मध्ये पुलवामा आत्मघाती हल्ला यासह भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये या गटाचा सहभाग आहे.अखेर या जैश ए मोहम्मदचे मुख्यालय उध्वस्त करत भारताने दणका दिला आहे.