Air Travel | दिवाळीचा सण अगदी तोंडावर आलेला आहे. जे लोक घरापासून लांब राहतात ते दिवाळीच्या सणामध्ये त्यांच्या घरी जात असतात. जर तुम्ही परदेशी राहत असाल आणि तुम्हाला विमानाने तुमच्या घरी जायचे असेल, तर आता ही तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण यावर्षी विमानाच्या प्रवास (Air Travel)भाड्यामध्ये जवळपास 20 ते 25 टक्क्यांनी घसरण झालेली आहे. त्यामुळे विमानाचा प्रवास हा आता आधीपेक्षा अत्यंत स्वस्त झालेला आहे.
विमान प्रवासात घसरण का झाली | Air Travel
हाती आलेल्या माहितीनुसार तेलाच्या किमतीमध्ये घसरण झालेली आहे. त्यामुळे विमानाचे भाडे देखील कमी करण्यात आलेले आहे. आता कोणत्या मार्गावर किती भाडे असणार आहे, याबद्दल आपण जाणून घेऊया. ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म इक्सीगोच्या अहवालानुसार, देशांतर्गत प्रवासासाठी विमान भाडे हे 20 ते 25 टक्क्यांनी कमी झालेले आहे. या किमती 30 दिवसांच्या आगाऊ खरेदी तारखेवर सरासरी एक मार्ग भाड्यासाठी आहेत 2023 चा कालावधी 10 ते 16 नोव्हेंबर आहे तर यावर्षी 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर असा आहे. या विमान प्रवासाच्या भाड्यात 20 ते 25 टक्क्यांनी घसरण झाल्यामुळे आता विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना चांगलाच दिलासा मिळालेला आहे.
कोणत्या मार्गावर किती भाडे झाले कमी? | Air Travel
यामध्ये बंगळुरू कलकत्ता फ्लाईटचे विमान भाडे हे 38 टक्क्यांनी कमी झालेले आहे. ते केवळ 6300 रुपये एवढे झालेले आहे. जे मागील वर्षी 10, 195 रुपये एवढे होते त्याचप्रमाणे चेन्नई कोलकत्ता या मार्गावरील तिकिटाचे दर हे 36 टक्क्यांनी कमी झाले होते. मागील वर्षी ही किंमत 8725 रुपये होती, तर यावर्षी केवळ 5604 रुपये एवढी आहे.
मुंबई ते दिल्ली फ्लाईटच्या विमान भाड्यामध्ये 34 टक्क्यांनी घसरून झालेली आहे. मागील वर्षी हे विमान भाडे 8788 रुपये एवढे होते. ते आता 5762 रुपये एवढे झालेले आहे. त्याचप्रमाणे दिल्ली उदयपूर मार्गावरील तिकिटांचे दर हे 11296 रुपये एवढे होते. ते आता 7469 रुपये झालेले आहे म्हणजेच. या दरामध्ये 34 टक्क्यांनी घसरन झालेली आहे. त्याचप्रमाणे दिल्ली कोलकत्ता हैदराबाद दिल्ली आणि दिल्ली श्रीनगर या मार्गावरील विमान भाड्यात 32 टक्क्यांनी घसरण झालेली आहे.