Air Travel : अनेकदा असे होते की विमानात बसल्यानंतर विमान उड्डाण घ्यायला मात्र खूप वेळ लागतो. त्यामुळे अनेकदा विमान प्रवाशांना ताठकळत विमानातच बसावे लागते. मात्र आता हा नियम बदलला आहे. एव्हिशन सेफ्टी लक्षात घेणारी संस्था ब्युरो ऑफ सिविल एव्हिशन सिक्युरिटी म्हणजेच (BCAS) ने एक नवी गाईडलाईन जारी केली आहे. या गाईडलाईनुसार आता जर बराच उशीर विमान उड्डाण (Air Travel ) घेणार नसेल तर प्रवासी विमानाच्या बाहेर पडू शकतात.
खरेतर लवकर पोहचण्यासाठी प्रवासी विमान प्रवासाचा (Flight Boarding Rules) पर्याय निवडतात. मात्र उड्डाणे उशिरा होत असल्यामुळे विमानात चढल्यानंतर बराच वेळ प्रवाशांना अडकून राहावे लागायचे. याबाबतच्या अनेक तक्रारीही यायच्या. एव्हढेच नाही तर विमान कम्पनीच्या (Air Travel) कर्मचाऱ्यांशी प्रवाशांनी या करणावरून अनेकदा भांडणे केल्याचीही उदाहरणे आहेत. म्हणूनच नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
याबाबत माहिती देताना बीसीएएसचे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी सोमवारी सांगितले की, नवीन मार्गदर्शक तत्त्वे 30 मार्च रोजी एअरलाइन्स आणि विमानतळ ऑपरेटरसाठी जारी करण्यात आली होती आणि आता ती लागू झाली आहेत. ते म्हणाले की या मार्गदर्शक तत्त्वांमुळे प्रवाशांना कमी त्रास होईल आणि विमानात चढल्यानंतर त्यांना जास्त वेळ बसावे लागणार नाही.
देशातील देशांतर्गत हवाई वाहतूक वेगाने वाढत आहे आणि दररोज सुमारे 3,500 उड्डाणे चालविली (Air Travel) जातात. BCAS आणि इतर प्राधिकरणांनी वाढत्या हवाई वाहतूक दरम्यान विमानतळांवरील वाढणाऱ्या गर्दीचा सामना करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.