OnePlus Nord CE 4 भारतात लॉन्च!! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| स्मार्टफोन बाजारामध्ये अखेर 1 एप्रिल रोजी बहुचर्चित असणारा OnePlus Nord CE 4 हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 SoC, 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. यासह 50-मेगापिक्सेल कॅमेरासोबत ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. OnePlus च्या Nord CE 4 स्मार्टफोनमध्ये 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. नुकताच लॉन्च झालेला Nord CE 4 दिसायला सर्वाधिक आकर्षित असल्यामुळे या फोनची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे आज आपण या स्मार्टफोनचे फिचर्स आणि किंमत जाणून घेणार आहोत.

OnePlus Nord CE 4 Price

OnePlus Nord CE 4 स्मार्टफोन डार्क क्रोम आणि सेलाडॉन मार्बल या 2 कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये फुल HD+ एमोलेड डिस्प्ले सपोर्ट देण्यात आला आहे. यासह फोनमध्ये 6.7 इंच डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. या स्मार्टफोनच्या किमती विषयी बोलायचे झाले तर, भारतामध्ये हा स्मार्टफोन 24,999 रुपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज टॉप-एंड व्हेरिएंटची एकूण किंमत 26,999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन 4 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजल्यापासून ऑनलाइन स्टोअर, Amazon India आणि इतर स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

OnePlus Nord CE 4 Features

हा स्मार्टफोन OxygenOS 14 वर चालणारा आहे. ज्यात 93.40 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आहे. तर 6.7-इंच फुल-एचडी डिस्प्ले उपलब्ध आहे. AMOLED डिस्प्ले, 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, HDR10 सपोर्ट, 8GB LPDDR4x RAM, अशा कित्येक गोष्टी या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहेत. फोटो आणि व्हिडिओसाठी तर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, हा फोन 100W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो, जे फक्त 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये फुल पावर देते. या फोनला 4 वर्षांची बॅटरी लाईफ देखील देण्यात आली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे अशा अनेक कारणांसाठी हा स्मार्टफोन खरेदीसाठी उत्तम पर्याय ठरत आहे.