हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मोबाईल ही आता एक गरज न राहता, व्यसन झाले आहे. आजकाल अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांकडे मोबाईल असतो. परंतु हा मोबाईल वापरायचा म्हटलं तर त्यासाठी मोबाईलमध्ये रिचार्ज प्लॅन असणं खूप गरजेचे आहे. यासाठी आजकाल अनेक नवनवीन रिचार्ज प्लॅन (Airtel Cheapest Recharge Plan)देखील उपलब्ध आहे. अगदी 28 दिवसांपासून ते 1 वर्षाचे रिचार्ज प्लॅन देखील आजकाल उपलब्ध आहेत.
एकमेकांशी स्पर्धा करून पुढे जाण्यासाठी सर्व टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर देत आहेत. ज्यामध्ये ते कमीत कमी किमतीत ग्राहकांना जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल. यावर विचार करत आहेत. अगदी कॉलिंगपासून ते डेटापर्यंत सगळ्याच गोष्टी आता आपल्याला एकाच प्लॅनमध्ये मिळतात.
जेव्हा आपण कोणताही रिचार्ज प्लॅन करतो. तेव्हा तो किती दिवसांसाठी आहे? त्याचप्रमाणे अनलिमिटेड कॉलिंग आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किती डेटा प्लॅन आहे? हे आपण पाहतो. अनेकवेळा एकाच प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा, एसएमएस यांसारख्या सुविधा मिळतात.
असाच एक नवीन प्लॅन एअरटेलने (Airtel Cheapest Recharge Plan) त्यांच्या ग्राहकांसाठी लॉन्च केला आहे. हा प्लॅन 365 दिवसांचा आहे आणि अगदी दोन हजार रुपयांपेक्षाही कमी किंमत या प्लॅनची आहे. हा प्लॅन 1799 रुपयांमध्ये हा एक वर्षाचा प्लॅन आहे. ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फायदे मिळतात.
1799 रुपयांच्या प्लॅनचे फायदे | Airtel Cheapest Recharge Plan
एअरटेलने लॉन्च केलेला हा नवीन 1799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा 365 दिवसांसाठी आहे. यामध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग 24 जीबी डाटा आणि 3600 एसएमएसचा लाभ मिळणार आहे. एवढेच नाही तर ग्राहकांना oppolo 24-7 सर्कल सबस्क्रीप्शन तीन वर्षासाठी मोफत मिळणार आहे. त्याचप्रमाणे हॅलो ट्यून्स आणि wynk म्युझिक यांच्या सुविधा मिळणार आहेत.
तुम्ही तर कॉलिंग आणि एसएमएस जास्त प्रमाणात वापरत असाल. तर हा तुमच्यासाठी अत्यंत परवडणारा प्लॅन आहे. त्यामुळे तुम्ही जर वर्षभराचा प्लॅन केला तर यामध्ये तुम्हाला खूप जास्त फायदा होईल