Airtel ग्राहकांसाठी खुशखबर!! आता फक्त 9 रूपयात मिळणार अनलिमिटेड डेटा; पहा ऑफर

Airtel plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एअरटेलने (Airtel) आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. खास म्हणजे, या प्लॅनची किंमत फक्त 9 रुपये आहे. परंतु या 9 रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लॅनसह कंपनीकडून मोफत अमर्यादित कॉलिंग किंवा एसएमएसचा लाभ दिला जाणार नाही. त्याऐवजी अनलिमिटेड हाय स्पीड डेटा दिला जात आहे. त्यामुळेच सध्या ग्राहकांना हा प्लॅन चांगला परवडत आहे.

ऑफर काय आहे??

एअरटेलने आपल्या अधिकृत साइटवर रिचार्जसाठी लिस्ट जाहीर केली आहे. ज्यात हा 9 रुपयाचा रिचार्ज प्लॅन दाखवण्यात आला. एअरटेलकडून हा 9 रुपयांचा प्लॅन 10 GB च्या FUP मर्यादेसह लॉन्च करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, या प्लॅनमध्ये तुम्हाला 10 GB पर्यंत चांगल्या हाय-स्पीड डेटाचा लाभ घेता येईल. परंतु ठराविक मर्यादा पूर्ण झाल्यानंतर वेग 64kbps पर्यंत कमी होईल. तोपर्यंत तुम्ही या प्लॅनचा कोणत्याही अडथळ्याशिवाय लाभ घेऊ शकता.

प्लॅनची वैधता

9 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनसह एअरटेल ग्राहकांना फक्त 1 तासाची वैधता दिली जात आहे. म्हणजेच ग्राहक या प्लॅनमध्ये 60 मिनिटांसाठी अमर्यादित डेटा वापरू शकतात. लक्षात घ्या की, या 9 रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला मोफत अमर्यादित कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा देत नाहीये. त्यामुळे या प्लॅनमध्ये फक्त डेटाचा वापर करता येऊ शकतो. ज्यात तुम्ही आवडता मूव्ही, सिरीयल व इतर मनोरंजनाच्या गोष्टी पाहू शकता.