हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ३ जुलैपासून देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या असलेल्या एअरटेल आणि जिओने आपल्या मोबाईल रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत. कंपन्यांच्या या निर्णयाचा मोठा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत असून आधीच महागाईने त्रस्त झालेला सर्वसामान्य माणूस आता रिचार्जच्या किमतींनी हैराण झाला आहे. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी कमीत कमी खर्चात कोणता रिचार्ज उपलब्ध आहे याचा शोध सर्वजण घेत आहेत. तुम्हीही जर एअरटेलचे ग्राहक असाल आणि स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला एअरटेलचा सर्वात कमी किमतीच्या रिचार्ज (Airtel Mobile Recharge) प्लॅनबाबत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात…..
रिचार्जच्या किमती वाढल्यानंतरही, जर तुम्ही Airtel च्या पोर्टफोलिओवर नजर टाकली तर, कंपनी अजूनही आपल्या वापरकर्त्यांना वेगवेगळ्या किमतीनुसार अनेक परवडणारे रिचार्ज प्लॅन सुद्धा ऑफर करत आहे. काही रिचार्ज प्लॅन हे अनलिमिटेड कॉलसह येतात तर काही प्लॅन हे भरपूर इंटरनेटसह येतात. तस बघितलं तर एअरटेलचा सामना हा जिओशी असतो, त्यामुळे जिओला टक्कर देण्यासाठी कंपनीने 199 रुपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज लाँच केला आहे. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची असल्याने नक्कीच तो सर्वसामान्याना परवडतोय.
Airtel च्या 199 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या कालावधीमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो, म्हणजेच तुम्ही २८ दिवस कोणालाही कितीही वेळ कॉल करू शकता. तसेच ग्राहकांना १०० एसएमएसची सुविधा सुद्धा मिळतेय. याशिवाय 2 GB इंटरनेट डेटा ग्राहक या संपूर्ण व्हॅलिडिटी मध्ये वापरू शकतात. एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Hello Tunes आणि Wynk Music वर फ्री एक्सस मिळतो. एकूणच काय तर या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना कोणत्याही नेटवर्कवर अतिरिक्त फायदे, संपूर्ण कॉलिंग आणि संदेश पाठवण्यासह एकूण 2GB डेटा मिळतो.