हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सगळीकडे ऑनलाईन पेमेंटच फॅड आहे. आपण मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या काही सेकंदात एकमेकांना पैसे पाठवू शकतो. पण आता फक्त मोबाईलच नव्हे तर स्मार्टवॉच वरूनही तुम्ही पैसे पाठवू शकता. ऐकायला नवल असेल पण हे खरं आहे. बाजारात एअरटेल पेमेंट्स बँक स्मार्टवॉच (Airtel Payments Bank Smartwatch) लाँच झालं असून या घडाळ्याच्या माध्यमातून 1 रुपयांपासून ते 25 हजार रुपयांपर्यंत पैसे तुम्ही एकमेकांना पाठवू शकता.
प्रसिद्ध टेक कंपनी नॉईजने एअरटेल पेमेंट्स बँक आणि मास्टरकार्डच्या सहकार्याने हे स्मार्टवॉच तयार केलं आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.85 इंचाचा ब्राइट डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 550 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यात मास्टरकार्ड नेटवर्क सपोर्टेड NFC चिप बसवण्यात आली आहे. एअरटेल पेमेंट्स बँक स्मार्टवॉचमध्ये यूजर्सना टॅप आणि Pay चा ऑप्शन मिळतो. त्याद्वारे यूजर्स दिवसाला जास्तीत जास्त 25 हजार रुपयांपर्यंत पेमेंट आरामात करू शकतात. थँक्स ॲपद्वारे वापरकर्ते ते त्यांच्या बचत खात्याशी जोडू शकतील.
हे स्मार्टवॉच (Airtel Payments Bank Smartwatch) इतर स्मार्टवॉच प्रमाणेच तुमच्या आरोग्याचीही पूर्ण काळजी घेऊ शकते. यामध्ये हृदय गती मॉनिटर, SpO2 सेन्सर, स्लीप-स्ट्रेस ट्रॅकर, मासिक पाळी मॉनिटर आणि 130 स्पोर्ट्स मोड यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. एअरटेल पेमेंट स्मार्टवॉचला IP68 रेटिंग देखील देण्यात आली आहे. म्हणजेच पाणी आणि धुळीपासून या घड्याळाला कोणताही धोका नाही. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हे स्मार्टवॉच तब्बल 10 दिवसांचा बॅकअप देते.
किंमत किती? Airtel Payments Bank Smartwatch
एअरटेल पेमेंट्स बँक स्मार्टवॉचची किंमत 2,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्ही हे स्मार्टवॉच काळ्या, राखाडी आणि निळ्या रंगात खरेदी करू शकता.