Airtel Plan Offer | भारतामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या उदयास आलेल्या आहे त्यांनी त्यांचे चांगले नाव देखील कमावले आहे l. परंतु भारतीय एअरटेल लिमिटेड ही कंपनी अनेक देशांमध्ये टेलिकॉम सेवा पुरवणारी एक मल्टिनॅशनल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि आपले ग्राहक टिकून ठेवण्यासाठी ही कंपनी नेहमीच ग्राहकांना नवनवीन आणि त्यांना परवडणारे रिचार्ज प्लान लॉन्च करत असते. परंतु आता एअरटेलने असा काही रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. ज्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसलेला आहे. एअरटेलने (Airtel Plan Offer) त्यांच्या दोन स्वस्त प्रीपेड प्लॅनच्या शुल्कामध्ये गुपचूप वाढ केलेली आहे, जी अनेकांना माहीत नाहीये.
118 रुपयांचा रिचार्ज प्लॅन | Airtel Plan Offer
भारतीय एअरटेलचा 108 रुपयांचा रिचार्ज प्लॅन होता या प्लॅनची किंमत आता 129 रुपये करण्यात आलेली आहे. हा प्लॅन त्यांच्या ग्राहकांना 12 जीबी डेटा ऑफर करत असतो. हा एक डेटा पॅक आहे. ज्यामुळे ग्राहक त्यांचा आधीच प्लॅन असल्यावर ती अधिक डाटासाठी हा रिचार्ज प्लॅन करतात.
289 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
भारतीय एअरटेलच्या 289 रुपयांच्या प्लॅन ची किंमत आता त्यांनी 329 रुपये करण्यात आलेली आहे. हा प्लॅन ग्राहकांना 4 जीबी डेटा प्लॅन देतो. त्याचप्रमाणे अमर्यादित वाईस कॉलिंग आणि 300 एसएमएस देतो. हा प्लॅन 25 दिवसांचा आहे. या प्लॅनसोबत ग्राहकांना अपोलो 24/7 सर्कलचे सदस्यत्व, विनामूल्य हॅलो ट्यून्स आणि रिंग म्युझियममध्ये देखील विनामूल्य प्रवेश मिळणार आहे.
भारतीय एअरटेल कंपनीने या आधीच टेलिकॉम सेवेचे दर वाढवण्याचे संकेत दिलेले होते. त्यामुळे आता एअरटेलने त्यांच्या दोन्ही स्वस्त प्लॅनची किंमत वाढवलेली आहे.
एअरटेलने त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ (Airtel Plan Offer) करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील त्यांनी त्यांच्या अनेक रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केलेली आहे. गेल्या वर्षी कंपनीने काही प्लॅन रद्द केले आहेत. भारती एअरटेलचा याआधी 99 रुपये किमतीचा बेस्ट प्लॅन योजना होती. ती देखील मागील वर्षी या कंपनीने अनेक राज्यांमध्ये बंद केलेली आहे. त्यानंतर त्यांनी या योजनेचे दर 57 टक्क्यांनी वाढवले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना त्यांचे सिम चालू ठेवण्यासाठी किमान 150 रुपयांचा रिचार्ज करणे गरजेचे आहे. एअरटेलने 2022 पासून ही योजना सुरू केलेली आहे. ती त्यांनी ओडिसा आणि हरियाणामध्ये बंद केली नंतर आंध्र प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, उत्तरप्रदेश, राजस्थान इत्यादी राज्यांमध्ये 2023 पर्यंत या प्लॅनची मोठ्या प्रमाणात व्याप्ती करण्यात आली.