Airtel Recharge Plan : एअरटेल ही देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आहे. देशभरात एअरटेलचे करोडो यूजर्स आहेत. एअरटेल नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना आणत असते. मोबाईल रिचार्ज व्यतिरिक्त OTT वापरकर्त्यांसाठी सुद्धा एअरटेल नवनवीन प्लॅन लाँच करत असतात. आत्ताही एअरटेलने आपल्या यूजर्ससाठी 148 रुपयांचा प्लॅन आणला आहे. या रिचार्जप्लॅनच्या माध्यमातून तुम्हाला तब्बल 15 OTT ॲप चालवण्याचा ऍक्सेस मिळतोय.
एअरटेलचा 148 रुपयांचा प्लॅन हा डाटा ॲड-ऑन प्लॅन आहे. याचा अर्थ तुम्ही तुमच्या नियमित रिचार्ज प्लॅनसह याचा लाभ घेऊ शकता. तुमचे इंटरनेट संपले तरी तुम्ही हा रिचार्ज प्लॅन (Airtel Recharge Plan) करून महिनाभर त्याचा वापर करू शकाल. यामध्ये तुम्हाला 15 पेक्षा जास्त OTT ॲप्सचा लाभ घेण्याची संधी मिळत आहे. हे 15 ॲप चालवण्यासाठी केवळ सबस्क्रिप्शनच नाही तर फ्री डेटाची सुविधाही दिली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी हा अतिशय परवडणारा रिचार्ज प्लॅन आहे.
कोणकोणत्या OTT प्लॅटफॉर्मचा समावेश – Airtel Recharge Plan
एअरटेलकडून तुम्हाला या रिचार्ज प्लॅन (Airtel Recharge Plan) अंतर्गत ज्या OTT सुविधांचा लाभ मिळणार आहे, त्यामध्ये सोनी लिव्ह. मनोरमॅक्स, एअरटेल एक्स्ट्रीम प्ले. Lionsgate Play, Hoichoi आणि Eros Now सारख्या 15 OTT ॲप्सचा समावेश आहे. या अँप्सचा मोफत फायदा घेऊन तुम्ही त्याचा आनंद सुद्धा घेऊ शकता. मात्र याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे एअरटेलच्या या 148 रुपयांचा रिचार्ज प्लॅन मध्ये कॉलिंग किंवा एसएमएसचे कोणतेही फायदे दिले जात नाहीत. कॉलिंग आणि एसएमएस करण्यासाठी तुम्हाला दुसरा रिचार्ज करावा लागेल.