Airtel Recharge Plan: Airtel चा धमाकेदार रिचार्ज प्लॅन; Jio -Viला फटका बसणार

0
4
Airtel Recharge Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel Recharge Plan – ग्राहकांना जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी सर्व टेलिकॉम कंपन्या प्रयत्न करत असता. यासाठी ते जास्त व्हॅलिडिटी , अमर्यादित कॉलिंग आणि इतर सुविधा उपलब्ध करून देत असतात. आता एअरटेलने (Airtel ) ग्राहकांसाठी दमदार प्लॅन आणला आहे. ज्यामुळे कमी किंमतीत जास्त फायदे मिळणार आहे. या तगड्या ऑफरमूळे इतर कंपन्यांना स्पर्धा निर्माण होऊ शकते. ज्यात Vi , जिओ आणि BSNL सारख्या कंपन्यांचा समावेश असू शकतो. Airtel च्या 1029 च्या रिचार्जमध्ये ग्राहकांना तीन महिन्याची व्हॅलिडिटी मिळणार आहे. तर या प्लॅनमध्ये अजून कोणत्या सुविधा दिल्या जाणार आहेत, याची आज आपण माहिती पाहणार आहोत.

एअरटेलचा रिचार्ज प्लॅन (Airtel Recharge Plan) –

दीर्घकालीन व्हॅलिडिटी – एअरटेलने रु 1029 चा नवीन प्लॅन लाँच केला आहे, ज्यात ग्राहकांना 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.

अमर्यादित कॉलिंग – या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉलिंगची सुविधा मिळते, त्यामुळे वापरकर्त्यांना कोणत्याही नेटवर्कवर कॉल करता येतील.

मोफत एसएमएस – दररोज 100 मोफत एसएमएस मिळतात, ज्यामुळे ग्राहकांना इंटरनेटशिवाय संवाद साधता येतो.

ओटीटी सबस्क्रिप्शन – प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी Disney+ Hotstar चं मोफत सबस्क्रिप्शन मिळतं, ज्यामुळे वापरकर्त्यांना मनोरंजनासाठी अतिरिक्त खर्च करण्याची आवश्यकता नाही.

ग्राहकांसाठी उत्तम पर्याय – वारंवार रिचार्ज करण्याची आवश्यकता न पडता दीर्घकालीन सेवा मिळवणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन अत्यंत आकर्षक ठरू शकतो.

स्पर्धात्मक फायदे – एअरटेलचा हा प्लॅन जिओ आणि Vi च्या प्लॅन्सला तगडी टक्कर देऊ शकतो, विशेषत: कमी किमतीत जास्त फायदे देऊन.

मोबाइल सबस्क्रिप्शन फायद्यांसह – हा प्लॅन फक्त मोबाइलवर (Airtel Recharge Plan) Disney+ Hotstar पाहण्याची सुविधा देतो, त्यामुळे मोबाईल सर्फिंग अनुभव अधिक सुलभ होतो.

इतर कंपन्यांना स्पर्धा –

Airtel ने कमी किमतीती जास्त व्हॅलिडिटीचा प्लॅन (Airtel Recharge Plan) सादर केल्यामुळे बाजारात स्पर्धा निर्माण होऊ शकते. तसेच इतर टेलिकॉम कंपन्यांना त्यांची रणनीती बदलावी लागणार आहे. तसेच आपणही ग्राहकांसाठी कोणत्या सेवा सुविधा देऊ शकतो , अशा योजनांची आखणी करावी लागेल.