Airtel Recharge Plan: Airtel चा धमाका !! युजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लॅन्स लाँच; पहा फायदे

_Airtel Recharge Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel Recharge Plan – भारती एअरटेलने प्रीपेड युजर्ससाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. या नवीन प्लॅनची किंमत 451 रुपये असून, यामध्ये युजर्सना 50GB डेटा दिला जातो. या प्लॅनची व्हॅलिडिटी 30 दिवसांची आहे, पण ही व्हॅलिडिटी फक्त डेटा वाउचरसाठी आहे, म्हणजेच युजर्सकडे आधीपासून एक अ‍ॅक्टिव्ह बेस प्लॅन असणे आवश्यक आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा SMS ची कोणतीही सुविधा दिलेली नाही. फेअर यूसेज पॉलिसी (FUP) अंतर्गत, दिलेला 50GB डेटा संपल्यानंतर इंटरनेटची गती 64Kbps पर्यंत मर्यादित होते. तर चला या प्लॅनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

JioHotstar चे फ्री सब्स्क्रिप्शन (Airtel Recharge Plan)

या प्लॅनचा (Airtel Recharge Plan) आणखीन एक फायदा म्हणजे यामध्ये 90 दिवसांसाठी JioHotstar चे फ्री सब्स्क्रिप्शन दिले जात आहे. JioHotstar हा एक नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म आहे जो JioCinema आणि Disney+ Hotstar यांचे मर्ज केलेले स्वरूप आहे. युजर्स या सब्स्क्रिप्शनच्या माध्यमातून त्यांच्या मोबाईल किंवा टीव्हीवर IPL 2025 चे थेट सामने पाहू शकतात. तसेच विविध सिनेमे, टीव्ही शोज, अ‍ॅनिमेशन कंटेंट आणि डॉक्युमेंटरीज देखील बघता येतात.

इतर सब्स्क्रिप्शन प्लॅन्स –

JioHotstar चे इतर सब्स्क्रिप्शन प्लॅन्सदेखील उपलब्ध आहेत. 149 रु मध्ये मिळणाऱ्या अ‍ॅड-सपोर्टेड प्लॅनमध्ये युजर्सना 720p रिझोल्यूशनमध्ये मोबाईलवर कंटेंट पाहता येतो. याची व्हॅलिडिटी 90 दिवस आहे. प्रीमियम प्लॅनची किंमत 299 रु आहे आणि एक वर्षाचा सब्स्क्रिप्शन प्लॅन 1499 रु मध्ये मिळतो.

युजर्सकडे विविध पर्याय उपलब्ध –

एअरटेलप्रमाणेच (Airtel Recharge Plan) रिलायन्स जिओ आणि वोडाफोन आयडिया (Vi) कडून देखील अशाच प्रकारचे JioHotstar सब्स्क्रिप्शनसह रिचार्ज प्लॅन्स दिले जात आहेत. उदाहरणार्थ, जिओचा 100 रु चा प्लॅन 90 दिवसांसाठी अ‍ॅड-सपोर्टेड कंटेंटची सुविधा देतो. त्यामुळे युजर्सकडे विविध पर्याय उपलब्ध असून, त्यांच्या गरजेनुसार योग्य प्लॅन निवडता येतो.