Airtel Recharge Plan Hike : Airtel च्या ग्राहकांना दणका!! मोबाईल रिचार्ज 40 रुपयांनी महागला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Airtel Recharge Plan Hike : भारतातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Airtel चा ग्राहकवर्ग मोठा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात नेटवर्क असल्याने अनेकजण एअरटेल च्या सिम कार्डला आपली पसंती दाखवतात. मात्र आता याच एअरटेलच्या ग्राहकांना आता मोठा आर्थिक झटका बसला आहे, कारण एअरटेलने आपल्या २ रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. हे रिचार्ज प्लॅन नेमेके कोणते आहेत? त्यामध्ये किती रुपयांनी वाढ करण्यात आली आहे याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

118 रुपयांचा रिचार्ज प्लॅन – Airtel Recharge Plan Hike

एअरटेलने ज्या २ रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत त्यातील पहिला रिचार्ज प्लॅन आहे तो म्हणजे 118 रुपयांचा रिचार्ज प्लॅन…. या प्लॅनची किमती 118 रुपयांवरून 129 रुपये झाला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 12GB इंटरनेट डेटा दिला जातो. यामध्ये कॉलिंगची सुविधा मात्र मिळत नाही. ज्यांना जास्तीचे इंटरनेट वापरायचं असत त्यांच्यासाठी हा बेस्ट रिचार्ज प्लॅन आहे. या प्लॅनची ​​वैधता तुमच्या आधीपासून सक्रिय असलेल्या प्लॅनसारखीच राहील.

289 रुपयांचा रिचार्ज प्लॅन-

यानंतर दुसरा आहे तो म्हणजे एअरटेलचा 289 रुपयांचा रिचार्ज प्लॅन.. कंपनीने हा प्लॅन तर तब्बल ४० रुपयांनी महाग (Airtel Recharge Plan Hike) केला आहे. म्हणजेच ग्राहकांना या रिचार्ज साठी आता ३२९ रुपये मोजावे लागतील. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 35 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यामध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलची ऑफर दिली जाते. तसेच तुम्हाला 300 SMS मिळतात. परंतु जास्त इंटरनेट मात्र ग्राहकांना वापरता येत नाही. कंपनी 35 दिवसांसाठी 4 GB डेटा ऑफर करत आहे, त्यानंतर तुम्ही डेटा ॲड ऑनशी संबंधित पॅक निवडू शकता.