Airtel Recharge Plan Hike : Airtel च्या ग्राहकांना झटका; मोबाईल रिचार्जच्या किमती वाढणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Airtel Recharge Plan Hike । एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यांत नेटवर्क असल्याने ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणावर एअरटेलचे सिम कार्ड खरेदी करतात आणि रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून मोबाईलचा आनंद घेतात. मात्र आता एअरटेलच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी आहे. याचे कारण म्हणजे येत्या काळात एअरटेलचे रिचार्ज प्लॅन भारतात महाग होणार आहेत. कंपनीचे चेअरमन सुनील मित्तल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पोटात गोळा आला आहे.

Airtel चे रिचार्ज प्लॅन किती रुपयांनी वाढतील आणि ही दरवाढ नेमकी कधीपासून होईल याबाबतची माहिती सुनील मित्तल यांनी स्पष्ट केलेली नाही, परंतु एका अहवालानुसार, हे मोबाईल रिचार्ज प्लॅन जुलैनंतर वाढण्याची (Airtel Recharge Plan Hike) शक्यता आहे. येत्या काही महिन्यांत प्रति यूजर्स सरासरी महसूल (ARPU) 208 कोटींवरून 300 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे Airtel कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने पाऊले उचलण्यात येणार आहेत.

Jio- VI च्या किमतीही वाढणार? Airtel Recharge Plan Hike

भारतीय दूरसंचार क्षेत्रात एअरटेल , जिओ, आणि वोडाफोन आयडिया (VI) या तीन मोठ्या कंपन्या आहेत. यामध्ये BSNL चा सुद्धा समावेश केला जाऊ शकतो. खरं तर, डिसेंबर 2021 पासून भारतीय दूरसंचार क्षेत्रात किमतींमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही. मात्र जर Airtel ने आपले रिचार्ज प्लॅन वाढवले तर जिओ, आणि वोडाफोन सारख्या बाकी प्रतिस्पर्धी कंपन्या सुद्धा त्यांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास ग्राहकांसाठी हा ४४० वोल्ट झटका मानला जाईल.