Airtel Recharge Plan | Airtel ने ग्राहकांसाठी आणले सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लॅन; आजच घ्या लाभ

Airtel Recharge Plan

Airtel Recharge Plan | भारतातील लोकप्रिय टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि व्हीआयने त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहेत. सगळ्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढलेल्या आहे. हे नवीन नियम 3 जुलैपासून देशभरात लागू करण्यात आलेले आहेत.

रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे आता जिओ, एअरटेल आणि व्हीआय युजर्सनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. परंतु अशातच आता एअरटेलने (Airtel Recharge Plan) त्यांच्या ग्राहकांना दिलासा दिलेला आहे. त्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी काही स्वस्त प्लॅन देखील आणलेले आहेत.

एअरटेलने आणलेल्या या नवीन प्लॅन्सची किंमत 100 रुपये पेक्षा कमी असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला 11 रुपये, 49 रुपये, 99 रुपये, 22 रुपये, 33 रुपयांचा रिचार्ज प्लॅन मिळणार आहे. यामध्ये युजर्सला कमी किमतीत अनलिमिटेड डाटा मिळणार आहे. आता हे नवीन प्लॅन्स नक्की कशी आहेत हे आपण जाणून घेऊया.

11 रुपयांचा रिचार्ज प्लॅन | Airtel Recharge Plan

एअरटेलचा 11 रुपयांचा प्लॅन अतिशय स्वस्त असा प्लॅन आहे. यामध्ये युजरला एका तासासाठी अनलिमिटेड डेटा मिळतो. जेव्हा तुम्हाला रोज असणाऱ्या इंटरनेटपेक्षा जास्त इंटरनेटची गरज लागते. तेव्हा तुम्ही हा प्लॅन ऍक्टिव्ह करू शकता.

49 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

तुमचा दर दिवसभराचा डेटा प्लॅन संपला तर तुम्ही 49 रुपयांचा हा प्लॅन करू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण दिवसाच्या व्हॅलेडीटी सह अनलिमिटेड डेटा मिळतो.

99 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

99 रुपयांचा हा डेटा प्लॅन दोन दिवसांच्या व्हॅलेडीटी सह येतो. तुम्ही दोन दिवस अनलिमिटेड इंटरनेटचा वापर करू शकता.

22 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

22 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन्समध्ये युजर्सला एक जीबी इंटरनेट डेटा मिळतो. त्याचप्रमाणे हा डेटा सुपरफास्ट असण्याची हमी देखील एअरटेल ने दिलेली आहे

33 रुपयांचा रिचार्ज प्लॅन | Airtel Recharge Plan

33 रुपयांचा हा डेटा प्लॅन देखील एक दिवसांच्या व्हॅलिडीटी सह येतो यामध्ये ग्राहकाला दोन जीबी डेटा मिळतो.