Airtel Recharge Plan : Airtel ने ग्राहकांसाठी आणला नवा रिचार्ज प्लॅन; 399 रुपयांत मिळणार ‘हे’ फायदे

Airtel Recharge Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Airtel Recharge Plan । देशातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी असलेल्या Airtel ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. खरं तर
जुलै २०२४ मध्ये टॅरिफ वाढ होण्यापूर्वी एअरटेल ३९९ रुपयांचा प्लॅन ग्राहकांसाठी आणला होता. परंतु त्याच्यातील सुविधांमध्ये आता जमीन-अस्मानचा फरक झाला आहे. आता ग्राहकांना जास्तीचा फायदा देण्यासाठी कंपनीने पुन्हा एकदा हा रिचार्ज प्लॅन आणला आहे. आज आपण या रिचार्ज प्लानचे खास फायदे जाणून घेणार आहोत.

३९९ मध्ये ग्राहकांना काय काय मिळणार ? Airtel Recharge Plan

आपल्या ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा आणि लाभ देण्यासाठी एअरटेल नेहमीच प्रयत्नशील असते. त्याचाच भाग म्हणून पुन्हा एकदा नव्याने ३९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Airtel Recharge Plan) ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. यामध्ये वापरकर्त्यांना दररोज २.५ GB इंटरनेट डेटा, अनलिमिटेड व्हाईस कॉल, दिवसाला १०० SMS चा आनंद घेता येईल. या रिचार्ज प्लॅनचा कालावधी २८ दिवसांसाठी आहे. महत्वाची बाब म्हणजे यामध्ये तुम्हाला फक्त ४G च नव्हे तर ५G इंटरनेटचा लाभ मिळतोय. तसेच संपूर्ण २८ दिवसांसाठी मोफत Jio Hotstar चे सबस्क्रिप्शन सुद्धा मिळतेय. २८ दिवसांसाठी ३९९ रुपये म्हणजे दिवसाला १४.२५ रुपयांच्या खर्चात तुम्हाला हे सगळं मिळणार आहे.

एअरटेलचा, हा प्लॅन (Airtel Recharge Plan) परत आणण्याचा विचार ग्राहकांना अधिक पर्याय देण्यासाठी आहे. त्याच वेळी कंपनीचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल वाढवू शकतो. ३९९ रुपयांचा प्लॅन आता संपूर्ण भारतातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. परंतु प्रत्येकालाच या रिचार्ज प्लानचा फायदा आहे असं नाही… ज्या लोकांना जास्तीच्या इंटरनेटची गरज असते त्यांच्यासाठी हा रिचार्ज बेस्ट पर्याय आहे, कारण मध्ये ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा मिळतोय. परंतु ज्यांना जास्त इंटरनेटची गरज नसते आणि कॉलिंग साठीच मोबाईल लागतो अशा वापरकर्त्यांना मात्र हा ३९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन म्हणावा तसा कामाचा नाही.