… म्हणून राष्ट्रवादीबरोबर इतर कार्यक्रमांना गैरहजर होतो; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे काही दिवसापासून नाराज असल्याची चर्चा सुरु होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील मंथन शिबिरासही गैरहजेरी लावली. तर शिंदे गटाचे नेते मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत जे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. आता पाच दिवसानंतर पवार पुन्हा माध्यमांसमोर आले असून त्यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांनी आजारी असल्यामुळे कार्यक्रमांना गैरहजर होतो, असे सांगितले.

मावळ येथील एका कार्यक्रमात अजित पवार म्हणाले की, गेली चार-पाच वर्षे मी परदेशात गेलो नव्हतो. त्यामुळे 4 नोव्हेंबर रोजी मी परदेशात गेलो आणि काल मध्यरात्री मी पोहचलो. थकलो होतो, पण आज इथं आलो नसतो तर आणखी वेगळ्याच बातम्या लागल्या असत्या. दादा इथं आले, दादा इथं नाही आले, दादा गायब झाले, दादा नाराज झाले. काहीही बातम्या सुरू होत्या. दादा वाचून ह्यांचं काय नडते काय कळत नाही. दादाला काही खाजगी आयुष्य आहे की नाही? उगाच काहीही उठवून बदनामी करायची. असं म्हणत त्यांनी माध्यमांनाच लक्ष्य केलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मंथन शिबिरात शरद पवार यांनी आजारी असूनही हजेरी लावली तर दुसरीकडे अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगल्या होत्या. येव्हडच नव्हे तर अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे याना शिवीगाळ केल्यानंतर संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला मात्र अजित पवारांनी यावरून चकार शब्द नाही काढला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चाना उधाण आलं होत. मात्र आज त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देत या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे.